Prashant Paricharak : प्रशांत परिचारक यांनी 'ती' चूक मान्यच केली; म्हणाले...

Pandharpur Political News : कार्यकर्त्यांनी बुथ वाईज कामाला लागावे. कार्यकर्ता बळकट असेल तरच आपणाला विधानसभा निवडणुकीत यश येऊ शकेल.
Prashant Paricharak
Prashant ParicharakSarkarnama
Published on
Updated on

Solapur Politics : मागील विधानसभा निवडणुकीसारखे यंदाच्या निवडणुकीत कार्यकर्त्याला कोणाच्याही दावणीला बांधले जाणार नाही. जी चूक गेल्या वेळी ती चूक यंदा होणार नाही, असे म्हणत माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी पदाधिकाऱ्यांना विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागण्याचे आवाहन केले आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परिचारक गटाच्या निवडक कार्यकर्त्याचा स्नेह मेळावा तालुक्यातील कागष्ट येथे पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी दामाजी कारखान्याचे अध्यक्ष शिवानंद पाटील, अजित जगताप, युन्नुश शेख, भारत पाटील, शिवाजी नागणे, राजाराम जगताप, हरीभाऊ यादव, रणजीत जगताप, पिंटू गवळी, सचिन चौगुले, माधवानंद आकळे, श्रीकांत गणपाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

माजी आमदार परिचारक Prashant Paricharak म्हणाले, योग्य वेळ आल्यावर योग्य निर्णय घेवून निवडणूक लढवण्याबाबत जाहीर करू त्यासाठी कार्यकर्त्यांनी तयार राहावे. मागील तीन वर्षांत कार्यकर्त्याला जो त्रास झाला, तो त्रास मलाही झाला. ती चूक मला मान्य आहे. त्यामुळे या पुढील काळात तसा त्रास होणार नाही. कार्यकर्त्यांनी बुथ वाईज कामाला लागावे. कार्यकर्ता बळकट असेल तरच आपणाला विधानसभा निवडणुकीत यश येऊ शकेल, असा विश्वासही परिचारक यांनी व्यक्त केला.

दामाजीचे अध्यक्ष शिवानंद पाटील यांनी, विधानसभा निवडणुकीनंतर आपला गट संपवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र समविचारी आघाडीच्या माध्यमातून आपला गट जिवंत ठेवण्याचे काम केले. आपण आमच्यासाठी आमदार होण्यापेक्षा कार्यकर्त्यासाठी आमदार व्हावे. ज्या पक्षाची लाट आहे, त्या पक्षाची उमेदवारी घ्यावी, असे आवाहन केले.

Prashant Paricharak
Kolhapur Congress : टोल आंदोलन काँग्रेसच्या अंगलट; 22 जणांवर गुन्हा

माजी नगरसेवक अजित जगतापांनी, विधानसभा निवडणुकीत लोकांचा कल बघून निर्णय घ्यावा, असे सूचित केले. तर युन्नुश शेख म्हणाले, आपण सांगितले म्हणून आम्ही विधानसभा निवडणुकीत काम प्रामाणिकपणे केले.

आता तुम्ही स्वतः निवडूक लढवा. वारे कोणत्या दिशेला आहे, हे ओळखून त्या पक्षाची उमेदवारी घ्यावी, असे स्पष्ट मत व्यक्त केले. यावेळी हरी यादव, भारत पाटील, पिंटू गवळी, शिवाजी नागणे, राजाराम जगताप, रणजीत जगताप यांनी परिचारक गटाला आलेल्या अडचणी कथन केल्या.

Prashant Paricharak
Shivsena UBT : मातोश्रीवरील 'चौकडी' ठाकरेंना भेटू देईना ! ऐन विधानसभेच्या तोंडावर ठाकरे गटात खटके

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com