सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील पाणीप्रश्नावर आमदार सुभाष देशमुख (Subhash Deshmukh) आज प्रचंड आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. दक्षिण सोलापूर तालुक्यातील सीना नदी आणि कुरुल कालव्यात टेलपर्यंत पाणी सोडले नाही, त्यामुळे आमदार देशमुख हे शनिवारी (ता. १ एप्रिल) सोलापुरातील गुरुनानक चौकातील सिंचन भवनासमोर शेतकऱ्यांसह ठिय्या आंदोलन केले. (Subhash Deshmukh is aggressive on the water issue...directly phone to Devendra Fadnavis)
उजनी लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे आणि उपविभागीय अधिकारी शिरीष जाधव यांनी देशमुख यांच्याशी बराच वेळ चर्चा केली. पण, तोडगा निघाला नाही. जोपर्यंत पाणी सोडत नाही; तोपर्यंत आम्ही उठणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली. शेवटी आमदार देशमुख यांनी थेट राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच फोन लावला. फडणवीस यांच्याशी चर्चा केल्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले.
पाटबंधारे विभागामार्फत दक्षिण तालुक्यातील सीना नदी आणि कुरूल कालव्यात टेलपर्यंत पाणी सोडण्यात आलेले नाही, त्यामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते आहे. तसेच, उन्हाळ्यामुळे जनावरांच्या पाण्याचाही प्रश्न उद्भवला आहे. ते सोडावे, यासाठी देशमुख यांनी शुक्रवारी जलसंपदा विभागाला निवेदन दिले होते. त्यानंतरही पाणी न सुटल्याने देशमुख यांनी आज सोलापुरातील सिंचन भवनासमोर शेतकऱ्यांना सोबत घेऊन ठिय्या आंदोलन केले.
आमदार देशमुख यांच्याशी उजनी लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे आणि उपविभागीय अधिकारी शिरीष जाधव यांनी बराच वेळ चर्चा केली. पण, सर्वमान्य तोडगा निघू शकला नाही. त्यामुळे शेतकरी आणि आमदार देशमुखही संतप्त झाले. जोपर्यंत पाणी सोडत नाही; तोपर्यंत आम्ही उठणार नाही, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली.
शेवटी आमदार देशमुख यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच फोन लावला. मोबाईलचा स्पीकर ओपन करून त्यांनी फडणवीस आणि शेतकऱ्यांशी चर्चा घडवून आणली. फडणवीस म्हणाले की, आमदार सुभाष देशमुख यांच्यासोबत माझी चर्चा झाली आहे. मी वरिष्ठ अधिकाऱ्यांशीही बोललो आहे. पाणी आजपासून चालू करतोय. येत्या दोन ते तीन दिवसांत पाणी येईल, असे सांगितले. फडणवीसांनी हे सांगताच शेतकऱ्यांनी ‘देवेंद्र फडणवीस आगे बढो.... सुभाष बापू तुम आगे बढो....च्या’ घोषणा दिल्या.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.