Prashant Pracharak : ...म्हणून प्रशांत परिचारक हाती 'तुतारी' घेणार असल्याच्या चर्चांना तूर्तास तरी पूर्णविराम!

Prashant Pracharak and Sharad Pawar NCP News : 'काहींनी तर प्रशांत परिचारक यांनी 'तुतारी' हाती घेऊन 'या' मतदारसंघात निवडणूक लढवल्यास, त्यांना यश मिळू शकते.' असा राजकीय अंदाजही वर्तवला होता.
Prashant Paricharak
Prashant Paricharak Sarkarnama
Published on
Updated on

Vidhansabha Election and Prashant Pracharak : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार प्रशांत परिचारक हाती 'तुतारी' घेणार याविषयीच्या चर्चांना मागील काही दिवसांपासून उधाण आले होते. मात्लार आज(बुधवार) कोल्हापूर येथे झालेल्या भाजपच्या कार्यकर्त्या मेळाव्यात प्रशांत परिचारकांनी उपस्थिती लावल्यामुळे या चर्चेला सध्यातरी पूर्णविराम मिळाल्याचे दिसत आहे.

या आधी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परिचारक यांनी जिल्हा परिषद गटनिहाय कार्यकर्त्यांच्या मेळाव्यातून विद्यमान आमदारावर निशाणा साधला होता. तर दामाजी कारखान्यावर झालेल्या कृतज्ञता कार्यक्रमात माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल भविष्यात कृतज्ञता व्यक्त करा असे संकेत देत, भाजप बरोबर राहण्याच्या सूचना दिल्या होत्या.

तसेच परिचारक व भालके यांचा एकाच हारात सत्कार केल्यामुळे दामाजी कारखान्यात झालेल्या समविचारी आघाडी प्रमाणे पंढरपूर विधानसभेची निवडणूक समविचारी आघाडीकडून लढवणार का ? याविषयी चर्चा रंगत होत्या. काहींनी परिचारकांनी 'तुतारी' हाती घेऊन या मतदारसंघात निवडणूक लढवल्यास यश मिळू शकते असा राजकीय अंदाजही बांधला होता.

Prashant Paricharak
Sachin Sawant on Fadnavis : 'गृहमंत्र्यांच्या हातात बंदूक पाहून 'मिर्झापूर'मधील अखंडानंद..' ; सचिन सावंतांनी लगावला टोला!

मागील दहा दिवसांतील राजकीय घडामोडीवर अधिक चर्चा सुरू असताना आज भाजपची पश्चिम महाराष्ट्राचा कार्यकर्ता संवाद बैठक कोल्हापूर येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा(Amit Shah) यांच्या उपस्थितीत झाली. या बैठकीस परिचारक यांनी व्यासपीठावर उपस्थिती दाखवल्यामुळे सध्या तरी परिचारक हाती तुतारी घेणार नसल्याचे दिसून येत आहे.

त्यामुळे ही जागा आगामी निवडणुकीत भाजपचे आमदार समाधान आवताडे किंवा प्रशांत परिचारक यांच्यापैकी एक जण लढवणार अशी चर्चा सुरू झाली आहे. शिवाय या मतदारसंघातील आमदार आवताडे यांनी कामे केल्यामुळे आणि जातीय समीकरण तसेच स्टॅंडिंग आमदार असल्यामुळे कदाचित तेच पुन्हा भाजपचे(BJP) उमेदवार होतील, अशी चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे.

Prashant Paricharak
Madha Assembly Constituency : माढ्यात मोठा ट्विस्ट, विधानसभेच्या आखाड्यात 'किंगमेकर'ची एन्ट्री?

तर दोन दिवसांपूर्वी साम टीव्हीने पंढरपुरातील कार्यकर्त्यांच्या घेतलेल्या मुलाखतीत परिचारक समर्थक तालुकाध्यक्षाने देखील आमदार अवताडे व परिचारक यांच्या वादावर पक्ष श्रेष्ठीकडून विशेषता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांच्याकडून तोडगा निघेल असे संकेत दिले होते. त्या संकेताला प्रशांत परिचारकांच्या उपस्थितीने अधिक पुष्टी मिळाली. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून माजी आमदार प्रशांत परिचारक यांना कोणता शब्द मिळणार? याविषयी अंदाज आता त्यांच्या समर्थकांकडून वर्वतले जात आहेत.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com