Madha Assembly Constituency : माढ्यात मोठा ट्विस्ट, विधानसभेच्या आखाड्यात 'किंगमेकर'ची एन्ट्री?

Madha Assembly Constituency : बबनदादा शिंदे यांनी आपला राजकीय वारसदार म्हणून सुपुत्राचं नाव घोषित केलं आहे. माढ्यातील राजकारणात ट्विस्टवर ट्विस्ट येत आहेत.
umesh paricharak.jpg
umesh paricharak.jpgsarkarnama
Published on
Updated on

माढा विधानसभा मतदारसंघात राजकारण 360 अंशावर फिरत आहे. माढ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे ( अजितदादा पवार ) आमदार बबनदादा शिंदे यांनी निवडणूक न लढता मुलाला अर्थात रणजितसिंह शिंदे यांना मैदानात उतरवणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील, बबनदादा शिंदे यांचे पुतणे धनराज शिंदे हे सुद्धा तयारी करत आहेत. यातच माढ्यात परिचारकांची 'एन्ट्री' झाली आहे.

युटोपियन शुगरचे अध्यक्ष, सरपंचकीच्या निवडणुकीपासून लोकसभेपर्यंत नेहमी पडद्याआडून सूत्र फिरवणारे आणि 'किंगमेकर', अशी ओळख असलेले उमेश परिचारक यांनी हे माढ्यातून निवडणूक लढण्याची तयारी सुरू केली आहे. परिचारक गटातील कार्यकर्त्यांनी उमेश परिचारक यांच्याकडे निवडणूक लढवावी, असा प्रस्ताव ठेवला आहे. याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, असं आश्वासन परिचारकांनी कार्यकर्त्यांना दिलं आहे. परिचारकांनी निवडणूक लढल्यास रणजितसिंह शिंदे यांच्या अडचणी वाढू शकतात.

माढा ( Madha ) विधानसभा मतदारसंघात पंढरपूर तालुक्यातील 42 गावांचा समावेश आहे. या 42 गावांत परिचारक गटाची मोठी राजकीय ताकद आहे. त्याशिवाय याच मतदारसंघात माळशिरस तालुक्यातील 14 गावांचा समावेश आहे. त्यात परिचारकांकडील पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचा ही समावेश आहे. त्यामुळे माढा मतदारसंघातून परिचारकांना निवडणूक लढवणे सोपे असल्याचं कार्यकर्त्यांचं मत आहे.

umesh paricharak.jpg
Babandada Shinde : शरद पवार गटातील नेत्याच्या ‘त्या’ विधानामुळे बबनदादांबाबतचे गूढ आणखी वाढले...

यासंदर्भात मंगळवारी ( ता.25 सप्टेंबर ) पंढरपूर बाजार समितीचे माजी सभापती दिलीप आप्पा घाडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत परिचारक गटातील पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत माढा विधानसभा मतदारसंघातून उमेश परिचारक यांनी निवडणूक लढवावी, अशी मागणी त्यांच्याकडे केल्याचं घाडगे यांनी सांगितलं. मात्र, दोन दिवसांत निर्णय घेण्यात येईल, असं उमेश परिचारकांनी म्हटलं आहे.

42 गावांत चांगलं काम...

दिलीप घाडगे म्हणाले, "पंढरपूर तालुक्यातील 42 गावे माढा मतदारसंघात आहे. येथे एक लाख 5 हजार मतदार आहेत. पांडुरंग परिवारानं 42 गावांत चांगलं काम केलं आहे. त्यासह तिथे तीन जिल्हा परिषद सदस्य आणि सहा पंचायत समिती सदस्य आहेत. पांडुरंग सहकारी साखर कारखान्यानं या भागातील पाच लाख टन ऊसाचे गाळप करून सभासदांना चांगला ऊस दर दिला आहे."

पांडुरंग परिवाराची राजकीय ताकद मोठी...

"80 टक्के ग्रामपंचायतीवर पांडुरंग परिवाराची सत्ता आहे. माळशिरस तालुक्यातील 15 पंधरा गावांमध्येही पांडुरंग परिवार सक्रिय आहे. या भागातील सुमारे दीड लाख टन ऊस गाळप केले आहे. या भागात पांडुरंग परिवाराची राजकीय ताकद मोठी आहे," असं

umesh paricharak.jpg
Ajit Pawar : अजितदादा, आता तुमचे देव ईडी, सीबीआय, मोदी अन्‌ शाह असतील; शरद पवारांच्या नेत्याची जहरी टीका

दरम्यान, एकीकडे माजी आमदार प्रशांत परिचारक पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची तयारी करत आहेत. दुसरीकडे उमेश परिचारक हे माढ्यातून निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकतात. उमेश परिचारक यांनी माढ्यातून निवडणूक लढविण्याचं ठरवलं, तर बबनदादा शिंदे यांचे सुपुत्र रणजितसिंह शिंदे यांच्या अडचणीत भर पडू शकते. तसेच, अभिजित पाटील आणि धनराज शिंदे यांच्यासमोरही मोठं आव्हान निर्माण होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com