Pratik Patil meet Prakash Ambedkar : विशाल पाटील बंडाच्या तयारीत? भाऊ प्रतीक पाटलांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट

Loksabha Election 2024 : विशाल पाटील आपली भूमिका आज (बुधवार) सायंकाळी पत्रकार परिषद घेत स्पष्ट करणार आहेत. मात्र, विशाल पाटील यांचे बंधू माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांनी आज अकोल्यात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतल्याने वेगळीच चर्चा सुरू आहे.
Pratik Patil meet Prakash Ambedkar
Pratik Patil meet Prakash Ambedkarsarkarnama
Published on
Updated on

Sangli Loksabha : महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मंगळवारी (ता.9) पत्रकार परिषद घेत जागा वाटपाची माहिती दिली. त्यामध्ये शिवसेना (ठाकरे गट) आणि काँग्रेसमध्ये वाद असलेली सांगलीची जागा ठाकरे गटच लढणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. काँग्रेसचे विशाल पाटील येथून लढण्यास इच्छुक असले तरी ठाकरे गटाने चंद्रहार पाटील यांची उमेदवारी येथून घोषित केली आहे.

विशाल पाटील, विश्वजीत कदम सांगलीच्या जागेसाठी काँग्रेस हायकमांडला दिल्लीत जाऊन भेटले. मात्र ही जागा ठाकरे गटाकडेच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याच पार्श्वभूमीवर विशाल पाटील आपली भूमिका आज (बुधवार) सायंकाळी पत्रकार परिषद घेत स्पष्ट करणार आहेत. मात्र, विशाल पाटील यांचे बंधू माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील Pratik Patil यांनी आज अकोल्यात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतल्याने वेगळीच चर्चा सुरू आहे.

Pratik Patil meet Prakash Ambedkar
Sangli Politics: जयंत पाटलांची भूमिका संशयास्पद, सांगलीच्या वादावर तोंडावर बोट

प्रकाश आंबेडकर यांची भेट प्रतीक पाटील यांनी घेतल्याने विशाल पाटील हे बंड करत निवडणूक लढण्याचे शक्यता वर्तवण्यात येत आहे.मात्र, विशाल पाटील (Vishal Patil) यांनी निवडणूक लढवावी, अशी भूमिका सांगलीतील काँग्रेस कार्यकर्त्यांनी घेतली आहे. विशाल पाटील यांनी आज कार्यकर्त्यांची बैठक बोलवली आहे.

या बैठकीमध्ये ते आपली बाजू कार्यकर्त्यांसमोर ठेवतील. तसेच प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्यासोबत झालेल्या चर्चे विषयी देखील ते या बैठकीत माहिती देण्याची शक्यता आहे. दरम्यान, काँग्रेसची जागेवर शिवसेनेत प्रवेश केलेले चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्याने काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. अनेक जण राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. तसा इशारा त्यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना दिला आहे.

पाटील आणि माझी सकाळी भेट झाली. मात्र, मी त्यांना कुठलाही आग्रह केला नाही तसेच कुठलेही सजेशन दिले नाही. त्यांनी फाॅर्म भरावा मग पुढील पाहू, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. तसेच काँग्रेसवाल्यांनी ठरवलं पाहिजे की त्यांना महाराष्ट्र अस्तित्व ठेवायचे आहे की नाही. सांगलीमध्ये शिवसेनेचे काहीच अस्तित्व नाही, असा टोल देखील प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेनेला लगावला.

विशाल पाटील निवडणूक लढणार?

विशाल पाटील हे आज सायंकाळी आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. त्याआधी प्रतीक पाटील यांनी प्रकाश आंबेडकर यांना भेटून उमेदवारीबाबत चाचपणी केली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. प्रकाश आंबेडकर यांनी देखील मी त्यांना कुठलाही आग्रह केला नाही मात्र, विशाल पाटील यांनी निवडणूक लढायला हवी. त्यांनी फाॅर्म भरू द्या मग पुढील पाहू,असे म्हणक विशाल पाटील यांना निवडणूक लढण्यास प्रोत्साहीत केले आहे. त्यामुळे विशाल पाटील आपल्या कार्यकर्त्यासमोर काय भूमिका जाहीर करणार, याकडे महायुती आणि महाविकास आघाडीतील नेत्यांचे लक्ष लागले आहे.

(Edited By Roshan More)

Pratik Patil meet Prakash Ambedkar
Lok Sabha Election: प्रेम 'यांच' आणि 'त्यांच' सेम नसतं...; कविता शेअर करत शेलारांनी ठाकरेंना डिवचलं

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com