Karad APMC : पृथ्वीराज चव्हाण, ॲड. उंडाळकर गटाची सत्ता कायम; पाटील, भोसलेंना नाकारले...

Congress कऱ्हाड शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीकडे सातारा जिल्ह्याचे लक्ष लागले होते. या निवडणुकीत काँग्रेस विरुध्द राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप असा सामना झाला.
Balasaheb Patil, Atul Bhosale, Udaysinh Undalkar, Prithviraj Chavan
Balasaheb Patil, Atul Bhosale, Udaysinh Undalkar, Prithviraj Chavansarkarnama
Published on
Updated on

-हेमंत पवार

Karad APMC Result News : उत्कंठावर्धक वातावरणात झालेल्या कराड बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण Prithviraj chavan व रयत कारखान्याचे अध्यक्ष ॲड. उदयसिंह पाटील यांच्या लोकनेते विलासराव पाटील उंडाळकर रयत पॅनेलने 12 जागा वर विजय मिळवत आपली सत्ता कायम राखली. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बाळासाहेब पाटील balasaheb patil व भाजपचे कार्यकरणी सदस्य अतुल भोसले यांच्या शेतकरी विकास पॅनेलला सहा जागांवर समाधान मानावे लागले.

कऱ्हाड शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीकडे सातारा जिल्ह्याचे लक्ष लागले होते. या निवडणुकीत काँग्रेस विरुध्द राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप bjp असा सामना झाला. त्यामुळे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी सहकारमंत्री आमदार बाळासाहेब पाटील, काँग्रेसचे सरचिटणीस ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर, भाजपचे कार्यकारणी सदस्य अतुल भोसले यांच्या प्रतिष्ठेची ही निवडणुक बनली होती.

बाजार समितीच्या निवडणुकीतुन पुढील निवडणुकांची पेरणी होणार असल्याने या निवडणुकीत आपल्याच पॅनेलला बहुमत मिळावे यासाठी नेत्यांनी शक्ती पणाला लावली होती. आमदार चव्हाण व उंडाळकर गटाच्या रयत पॅनलची एक जागा बिनविरोध झाली होती. त्यामुळे उर्वरीत १७ जागांसाठी ३४ उमेदवार निवडणुक रिंगणात होते.

Balasaheb Patil, Atul Bhosale, Udaysinh Undalkar, Prithviraj Chavan
Delhi-Mumbai Express way : मुंबई-दिल्लीचे अंतर लवकरच १२ तासांचं; मोदी करणार 'या' टप्प्याचं उदघाटन

काल रविवारी या निवडणुकीसाठी ४१९३ मतदारापैकी ४०७५ मतदारांनी मतदान केल्याने सरासरी ९७.१९ टक्के मतदान झाले होते. त्याची मतमोजणी आज निवडणूक निरीक्षक तहसीलदार विजय पवार, निवडणुक निर्णय अधिकारी संदीप जाधव यांच्या उपस्थितीत झाली. उमेदवार, प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत पहिल्यांदा सोसायटी गटाची मतमोजणीस प्रारंभ करण्यात आला.

Congress Activist karad
Congress Activist karadsarkarnama

त्या दरम्यान व्यापारी आणि त्यानंतर ग्रामपंचायत गटाची मतमोजणी करण्यात आली. त्यामध्ये आमदार चव्हाण, उंडाळकर यांच्या लोकनेते (स्व) विलासराव पाटील काका रयत पॅनेलने बाजी मारुन 12 जागा जिंकल्या. त्यामुळे या निवडणुकीत त्यांच्या पॅनेलची सत्ता आल्याचे स्पष्ट झाले आहे. तर आमदार पाटील आणि भोसले यांच्या गटाच्या शेतकरी विकास पॅनेलला 6 जागांवरच समाधान मानावे लागले आहे.

Balasaheb Patil, Atul Bhosale, Udaysinh Undalkar, Prithviraj Chavan
Satara News : मकरंद पाटलांनी थेट फोन केला अन्‌ मिळाले ३० लाख...

समितीच्या मतमोजणीस प्रारंभ झाल्यापासून विजयाचे पारडे कधी या पॅनलकडे तर कधी त्या पॅनलकडे झुकत होते. त्यातच सोसायटी मतदारसंघांमध्ये क्रॉस वोटिंग झाल्याने या मतदारसंघात दोन्ही पॅनलच्या जागा निवडून आल्या. त्यामुळे अंतिम निकाल जाहीर होण्यापूर्वीच दोन्ही पॅनेलच्या समर्थकांनी विजयाची उधळण गुलालाची उधळण केली होती.

Balasaheb Patil, Atul Bhosale, Udaysinh Undalkar, Prithviraj Chavan
Prithviraj Chavan News : बुलेट ट्रेनमुळे महाराष्ट्राच्या डोक्यावरचे कर्ज ४५ टक्क्यांनी वाढणार..

या निकालानंतर काका-बाबा गटाने प्रचंड जल्लोष केला. काका बाबा गटाला उत्तरमधून धैर्यशील कदम, मनोज घोरपडे यांची साथ मिळाली आहे. लोकनेते विलासराव पाटील उंडाळकर रयत पॅनेलचे विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे : सोसायटी मतदार संघ-विजयकुमार कदम 886 मते, दीपक उर्फ प्रकाश पाटील 898, सोसायटी महिला प्रवर्ग- इंदिरा जाधव पाटील 914, सोसायटी इतर मागास प्रवर्ग

Balasaheb Patil, Atul Bhosale, Udaysinh Undalkar, Prithviraj Chavan
Karad News : भविष्यात 'राष्ट्रवादी' सर्वात मोठा पक्ष होणार; मुख्यमंत्रीही आमचाच होणार...जयंत पाटील

सर्जेराव गुरव 922, सोसायटी भटक्या जमाती -संभाजी काकडे 924, ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदार संघ -संभाजी चव्हाण 928, राजेंद्र चव्हाण 937, ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल -शंकर इंगवले 972, ग्रामपंचायत अनुसूचित जाती - नितीन ढापरे 943, व्यापारी अडते गट जयंतीलाल पटेल 259, जगन्नाथ लावंड 255, हमाल मापाडी गणपत पाटील बिनविरोध. शेतकरी विकास पॅनेल-सोसायटी सर्वसाधारण -जगदीश जगताप 900, मानसिंगराव जगदाळे 891, दयानंद पाटील 900, उद्धवराव फाळके 989, विनोद जाधव 907, सोसायटी महिला प्रवर्ग

Balasaheb Patil, Atul Bhosale, Udaysinh Undalkar, Prithviraj Chavan
BJP-Congress Politics: पंतप्रधानांनी वंदे भारत एक्सप्रेस हिरवा झेंडा दाखवला; पण प्रवास पुर्ण होण्याआधीच...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com