Prithviraj Chavan : माझी लाडकी बहीण योजनेवरून पृथ्वीराज चव्हाण यांनी सरकारला झोडपले; नेमके काय म्हणाले?

Maharashtra Vidhansabha Adhiveshan : या योजनेत 21 वर्षावरील अविवाहित महिलांना वगळले आहे, त्यांचा काय दोष आहे ? त्यांना या योजनेचा फायदा मिळालाच पाहिजे, असा आग्रहच चव्हाणांनी केला.
Prithviraj Chavan
Prithviraj ChavanSarkarnama

Karad Political News : अर्थसंकल्पात राज्य सरकारने माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली. या योजनेची नोंदणीची अंतिम मुदत 15 जुलै आहे. नोंदणीला कोणतीही मुदत ठेवू नये, महिलांची वयोमर्यादा 60 वर्षांवरील महिलांसह अविवाहित महिलांनाही लाभ मिळावा. ही योजना निवडणुकीची घोषणा न राहता याचा कायदा केला जावा, अशा विविध मागण्या करत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सरकारचे वाभाडेच काढले.

आमदार चव्हाण Prithviraj Chavan म्हणाले, लाडकी बहिण योजनेच्या 15 जुलै अंतिम नोंदणीच्या तारखेमुळे राज्यात नोंदणी केंद्राबाहेर मोठी गर्दी होत आहे. राज्यात काही भागात उन्हाची तीव्रता अजून असल्याने काही महिलांना भोवळ आल्याची घटना घडल्या आहेत. काही भागात पावसातही रांगा लागल्या आहेत, याकडेही चव्हाण यांनी सरकाचे लक्ष वेधले.

महाराष्ट्रात पंढरपूरची वारी सुरू आहे. आषाढी एकादशी 17 जुलैला आहे. या वारीत जवळपास 10 लाख वारकरी सहभागी होतात. या वारीत निम्याहून अधिक महिला भाविक असतात. अशावेळी या योजेनच्या नोंदणीसाठी भाविक महिलांनी वारी सोडून यायचे का? असा खडा सवाल सरकारला केला.

प्रत्येक महिलेला तिचा अधिकार मिळालाच पाहिजे. ही योजना फक्त निवडणुकीपुरती सुरू करायची व त्यानंतर बंद करायची हे योग्य होणार नाही. केंद्रातील यूपीए सरकारने ज्याप्रमाणे अधिकारावर आधारित कायदे केले होते, त्याप्रमाणे या योजनेचाही कायदा करावा, अशी अग्रहाची मागणीही त्यांनी केली.

Prithviraj Chavan
Jayant Patil To Mahadeo Jankar : जयंत पाटील यांनी महादेव जानकरांना थेट वंदनच केलं

या योजनेत 21 वर्षावरील अविवाहित महिलांना वगळले आहे, त्यांचा काय दोष आहे ? त्यांना या योजनेचा फायदा मिळालाच पाहिजे. त्याचबरोबर 60 वर्षावरील सर्व महिलांना ज्यांना कोणी सांभाळणारे नसतील तर अशा वयोवृध्द महिलांना या योजेतून वगळणे योग्य नाही. त्यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी वयोमर्यादा 65 वर्षे केल्याची जाहीर केले.

एजंटाचा सुळसुळाट

लाडकी बहीण योजनेमुळे Ladki Lek Scheme नोंदणी केंद्राबाहेर एजंटचा सुळसुळाट झाला आहे. महिलांना उत्पानांचा दाखला काढण्यासाठी 700-800 रुपये मागितले जात आहेत, असा आरोप करुन आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरचा तुटवडा झालेला आहे. या त्रुटी शासनाने लवकरात लवकर दूर केल्या पाहिजेत, अशी मागणीही केली.

(Edited by Sunil Dhumal)

Prithviraj Chavan
Vishwajit Kadam & Anil Parab : साहेब, लक्ष असू द्या! विश्वजीत कदम यांच्या रिक्वेस्टवर अनिल परब यांनी हातच पुढे केला

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com