Vishwajit Kadam & Anil Parab : साहेब, लक्ष असू द्या! विश्वजीत कदम यांच्या रिक्वेस्टवर अनिल परब यांनी हातच पुढे केला

Assembly Monsson Session : शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते अनिल परब आणि काँग्रेसचे विश्वजीत कदम विधिमंडळ इमारतीच्या आवारात आमने-सामने आले. त्यावेळी त्यांनी सांगली लोकसभा जागेचा पट उलगडला.
Vishwajit Kadam, Anil Parab
Vishwajit Kadam, Anil ParabSarkarnama

Sangli Political News : सांगलीच्या जागेवर महाविकास आघाडीमधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस आमने-सामने आले होते. काँग्रेसच्या अपक्ष विशाल पाटील यांनी येथे बंडखोरी करत विजय मिळवला, तर शिवसेनेचे चंद्रहार पाटील यांचा पराभव झाला. सांगलीतील पराभवाचे शल्य शिवसेना ठाकरे पक्षाला आजही आहे.

विधिमंडळाच्या अधिवेशनात शिवसेना आणि काँग्रेस पक्षाचे आमदार आमने-सामने येण्याचे प्रसंग घडत आहेत. सांगलीतील लोकसभा निवडणुकीत किंगमेकरच्या भूमिकेत राहिलेले काँग्रेस नेते आमदार विश्वजीत कदम आणि शिवसेनेचे नेते अनिल परब हे असेच विधिमंडळ इमारतीच्या पायऱ्यांवर आमने-सामने आले. यांच्यात चालता-चालता दोन शब्दांचा रंगलेला संवाद आगामी राजकीय गणिताची गोळाबेरीज सांगणारा ठरला.

शिवसेनेचे नेते अनिल परब Anil Parab मुंबई पदवीधर मतदारसंघातून विजयी झाले आहेत. विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज उद्धव ठाकरे यांच्यासह प्रमुख नेत्यांनी विधिमंडळ इमारतीत हजेरी लावली. उद्धव ठाकरे गेल्यानंतर अनिल परब विधिमंडळ इमारत परिसरात घुटमळत होते.

अनिल परब विधिमंडळात काम घेऊन आलेल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते. विधिमंडळाच्या पायऱ्यावर, असाच कार्यकर्त्यांशी अनिल परब यांचा संवाद रंगला होता. यातच पाठीमागून काँग्रेस नेते आमदार विश्वजीत कदम आले. विश्वजीत कदम यांनी अनिल परब यांना पाहून थांबले.

विश्वजीत कदम Vishwajeet Kadam यांनी अनिल परब यांना विजयासाठी अभिनंदन करून पुढे निघाले. अनिल परब यांनीही घाईघाईने त्यांच्याकडे पहात अभिनंदन स्वीकारले. यावर विश्वजीत कदम यांनी अनिल परब यांना 'साहेब, लक्ष असू द्या'. एवढा शब्दप्रयोग केला.

यावर अनिल परब यांनी स्मित हास्य करत हात पुढे करत हस्तांदोलन केले. आणि दोघांनी एकमेकांना डोळे भिडवले. यानंतर दोघांमध्ये काही क्षण डोळ्यांमध्ये रंगलेली भाषा एकमेकांनाच कळली. अनिल परब यांना शुभेच्छा दिल्यानंतर विश्वजीत कदम पुढे दिशेने मार्गस्थ झाले.

Vishwajit Kadam, Anil Parab
Chandrahar Patil : चंद्रहार पाटील आणखी एक डाव टाकणार? उद्धव ठाकरेंच्या भेटीचं गुपीत काय?

या दोघांमध्ये काही क्षण झालेला हा संवाद सांगली Sangli लोकसभा जागेचा पट जागा करणारा ठरला. सांगली लोकसभा जागेसाठी महाविकास आघाडीतून शिवसेनेने चंद्रहार पाटील यांना निवडणुकीच्या आखाड्यात उभे केले होते. परंतु काँग्रेसने येथे बंडखोरी केली. विशाल पाटील निवडणुकीच्या रिंगणात आले. विश्वजीत कदम हे विशाल पाटील यांच्या उमेदवारीसाठी आग्रही होते. पण शिवसेने ठाम राहत जागा मिळवली. परंतु निवडणुकीत चित्र वेगळे राहिले.

अपक्ष उमेदवार विशाल पाटील Vishal Patil विजयी झाले. हा पराभव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या चांगला जिव्हारी लागला. त्यामुळे महाविकास आघाडी एकत्र असून देखील शिवसेना ठाकरे पक्ष आणि काँग्रेस यांच्यात या जागेवरून काहीशी अनबन आहे. यातच विधिमंडळाच्या अधिवेशनात या दोन्ही पक्षाचे आमदार आमने-सामने आल्यावर सांगलीचा पट उघडतोच उघडतो. असाच काहीसा प्रसंग अनिल परब आणि विश्वजीत कदम यांच्या भेटीमुळे घडला.

(Edited by Sunil Dhumal)

Vishwajit Kadam, Anil Parab
Ambadas Danve : निलंबनानंतर अंबादास दानवे यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, पाशवी बहुमताच्या...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com