Prithviraj Chavan : हा नरेंद्र मोदींचाच पराभव; भाजप PM पदासाठी पर्याय देणार; पृथ्वीराज चव्हाण नेमके काय म्हणाले?

INDIA Vs NDA Prithviraj Chavan Says It is Defeat of PM Narendra Modi : आता चंद्राबाबू यांना नितीश कुमारांना निमंत्रण देण्याचा प्रयत्न करण्यामध्ये हरकत नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात झाले तसे केंद्रातही होतील.
Prithviraj Chavan, Narendra Modi
Prithviraj Chavan, Narendra ModiSarkarnama

Lok Sabha Election 2024 Result : देशातील जनतेने नरेंद्र मोदी यांच्या विरोधात स्पष्ट कौल दिलेला आहे. 2014 आणि 2019 मध्ये मोदींना स्वतःच्या भाजपच्या पक्षाच्या ताकदीवर बहुमत मिळाले होते. यावेळी त्यांना त्या जागा मिळालेल्या नाहीत. नरेंद्र मोदींचा हा वैयक्तीक पराभव आहे.

भाजप सरकार स्थापन करण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र संघ आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदींनाच पुन्हा नेता निवडतील का? हा माझ्या मनातील प्रश्न आहे. ते दुसरा नेता निवडून पर्यायी व्यवस्था करण्याची शंका माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केली.

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर चव्हाण म्हणाले, संसदीय लोकशाहीमध्ये आपल्या पक्षाची धोरणे राबवयाची असतील तर सत्तेत यायला लागते. सर्व पक्षांतील लोकांना एकत्र येवून आपल्याला पंतप्रधानपद मिळावे, यासाठी दोन्ही बाजूकडून प्रयत्न केले जातील. इंडिया आघाडी आणि एनडीएमध्ये फार मोठा फरक नसेल. चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्या दोन मोठ्या घटक पक्षांनी काँग्रेसबरोबर पूर्वी काम केले आहे.

नितीश कुमार हे डाव्या विचारांचे होते. आता चंद्राबाबू यांना नितीश कुमारांना निमंत्रण देण्याचा प्रयत्न करण्यामध्ये हरकत नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात झाले तसे केंद्रातही होतील. नरेंद्र मोदी आणि अमित शहा आमच्यातील कोण फोडता येते का याचाही प्रयत्न करतील, अशीही शंका चव्हाण यांना बोलून दाखवली.

देशातील जनतेने नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या विरोधात स्पष्ट कौल दिलेला आहे. 2014 आणि 2019 मध्ये मोदींना स्वतःच्या भाजपच्या पक्षाच्या ताकदीवर बहुमत मिळाले होते. यावेळी त्यांना त्या मिळालेल्या नाहीत. नरेंद्र मोदींचा तो वैयक्तीक पराभव आहे.

भाजप सरकार स्थापन करण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र संघ आणि भाजपचे जेष्ठ नेते नरेंद्र मोदींनाच पुन्हा नेता निवडतील का, हा माझ्या मनातील प्रश्न आहे. ते दुसरा नेता निवडून पर्यायी व्यवस्था होताना दिसत आहे का याचीही माहिती घ्यावी लागणार आहे.

महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या सर्व घटकांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांचा चांगला समन्वय झाला. बुथ एजंटकडूनही चांगले काम झाले. कोणत्या पक्षाचा उमेदवार आहे हे पाहिले नाही. महाविकास आघाडी एकजीनसीपणाने लढली त्याचा हा कौल आहे. या निवडणुकीत पाच स्थानिक मुद्यावर आम्ही प्रचार केला. त्याला यश आले.

(Edited by Sunil Dhumal)

Prithviraj Chavan, Narendra Modi
Bajrang Sonwane Win : पवारसाहेबांच्या 'बजरंगा'ची कमाल ! पंकजा मुंडेंचा निसटता पराभव; सोनवणे विजयी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com