Satara News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईत अटल सेतूचे उद्घाटन केले. त्या कार्यक्रमात पंतप्रधानांनी काॅंग्रेसवर हल्लाबोल केला. तसेच, भाजप सरकारमुळे विकासकामे होत असल्याचा दावाही केला. पंतप्रधानांच्या या दाैऱ्यावर आणि दाव्याला काॅंग्रेसकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाऊ लागले आहे. अटल सेतूचे एकट्या भाजपने क्रेडिट घेणे हास्यास्पद असून भारताला 2014 मध्ये स्वातंत्र्य मिळाल्याची संकल्पना भाजपकडून मांडली जात आहे, अशी टीका करीत काॅंग्रेसनेते पृथ्वीराज चव्हाण यांनी हे सर्व खरं नसल्याचं म्हटलं आहे. ‘सरकारनामा’शी खास बातचीत करताना पंतप्रधान मोदींचं अभिनंदनही आमदार चव्हाण यांनी केलं. (Prithviraj Chavan targeted Narendra Modi for taking credit for Atal Setu)
देशात मोठे प्रकल्प पूर्ण होण्यासाठी किमान 10-15 ते 20 वर्षे लागतात. अशा प्रकल्पात मांडणी, मंजुरी, पायाभरणी आणि उद्घाटनं अशी होत राहतात. मुंबईतील मेट्रो 1 चं भूमिपूजन माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी केलं. मात्र उद्घाटन मी केलं. नवी मुंबईच्या मेट्रो 3 ची पायाभरणी मी केली होती, त्याचं उदघाटन नरेंद्र मोदी करीत आहेत. आता अटल सेतूची मंजुरी माझ्या काळात मिळाली. परंतु, आता उद्घाटन केले म्हणजे माझ्यामुळे झालं, क्रेडिट घेणं हास्यास्पद आहे, असा टोलाही पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपला लगावला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
‘नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन दुसरंच कोणीतरी करेल’
नवी मुंबईच्या विमानतळाची पर्यावरण मंजुरी माझ्या काळात झाली, म्हणून मी केलं म्हणणं चुकीचं आहे. टप्प्याटप्प्याने जो राज्यकर्ता असतो, तो काम पुढं ढकलण्याचं काम करीत असतो. आता नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन लोकसभेनंतर झालं, तर पुन्हा दुसरं कोणीतरी उद्घाटन करेल. परंतु एकट्याने क्रेडिट घेण्याचा प्रयत्न केला तर ते हास्यास्पद असेल. विकासकामे होत राहतात, आता यामध्ये फार श्रेयवादाचं काम करू नये. निवडणुका आल्याने राम मंदिर, भूमिपूजनांचं क्रेडिट घेण्याचा प्रयत्न भाजपचा सुरू आहे.
सरकारच्या पैशातून मोठमोठ्या जाहिराती
नरेंद्र मोंदींच्या भाजपकडून श्रेय घेण्याचा प्रयत्न स्वाभाविक आहे. सरकारी पैशातून मोठमोठ्या जाहिराती दिल्या जात आहेत, आम्ही केलं, असं सांगितलं जात आहे. या कामाची सुरुवात कोणीतरी दुसऱ्याने केलेली असते, आज योगायोगाने हा प्रकल्प पूर्ण झाल्याने त्याचं उद्घाटन केलं. काॅंग्रेस सत्तेत असताना अनेक प्रकल्प आम्ही पूर्ण केले आहेत.
भारताला 2014 मध्ये स्वातंत्र्य मिळालं आणि नंतर विकासकामं सुरू झाली. अशी जी काही संकल्पना मांडण्याचा प्रयत्न भाजपचे काही मित्र करीत आहेत, ते योग्य नाही. अशी कल्पना करणे म्हणजे तो फारच अपरिपक्वपणा आहे.
Edited By : Vijay Dudhale
R...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.