Satara Congress News : सध्याच्या सरकारमध्ये एक वाक्यता नसून चोऱ्या लपवण्यासाठी शिंदे, पवार गट सत्तेत गेला आहे. याबाबत लोकांच्या मनात चीड आहे. पाठीत खंजीर खुपसून ते सत्तेत सहभागी झाले आहेत, अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. दरम्यान, महाविकास आघाडीत काँग्रेस पक्ष मोठा असल्याने पदाधिकाऱ्यांनी आता जनतेपर्यंत पोहोचावे,असे आवाहन त्यांनी केले.
सातारा काँग्रेस Satara Congress भवनात जिल्हा काँग्रेस कार्यकारणीच्या आढावा बैठकीत श्री. चव्हाण Prithviraj Chavan बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, जिल्हा निरिक्षक श्रीरंग चव्हाण, ज्येष्ठ नेते उदयसिंह पाटील, महिला जिल्हाध्यक्षा अल्पना यादव, नरेश देसाई, राजेंद्र शेलार, ॲड. विजयराव कणसे, धनश्री महाडिक, रजनी पवार आदी उपस्थित होते.
श्री. चव्हाण म्हणाले, राज्यातील सध्याच्या परिस्थितीला भाजप जबाबदार आहे. अडीच वर्षांपूर्वी महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले होते. त्यावेळी काँग्रेस छोटा पक्ष होता. आता परिस्थिती बदलली आहे. सत्तांतर झाले असून महाविकास आघाडीत काँग्रेस पक्ष मोठा आहे. २०२४ च्या निवडणुकीसाठी महाराष्ट्र महत्वाचे राज्य आहे.
महाविकास आघाडी एकत्र लढली तर भाजप हरणार हे नक्की आहे. कर्नाटकातील भाजपचा पराभव त्यांना सहन होत नाही. छत्तीसगड, राजस्थानमध्ये भाजप पराभव नक्की आहे. भाजपला महाराष्ट्र पाहिजे असल्यामुळे अमित शाह यांनी शिवसेना व त्यानंतर राष्ट्रवादी फोडली. भाजप विरोधात काँग्रेस लढणार आहे.
राज्यात वंचितमुळे अनेक ठिकाणी खासदार पडले आणि भाजपला त्याचा फायदा झाला आहे. राज्यातीलही राजकीय परिस्थिती समजून सांगण्यासाठी सध्या चांगली परिस्थिती आहे. त्यामुळे काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी तळागाळापर्यंत पोहोचावे. भाजपला नवी व्यवस्था स्थापन करायची असून संभाजी भिडे सारखा माणूस समाजात विष कालवत सुटला असल्याचे त्यांनी सांगितले.
Edited By : Umesh Bambare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.