पृथ्वीराजबाबांचा राहुल गांधींना कधीच विरोध नव्हता, 'ते' वृत्त म्हणजे खोडसाळपणा

Prithviraj Chavan : सोशल मीडिया वर सध्या बाबांबाबत अपप्रचार केला जात आहे.
Prithviraj Chavan Latest News
Prithviraj Chavan Latest NewsSarkarnama

कऱ्हाड : पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी मध्यंतरी काँग्रेसबद्दल (Congress) मांडलेली भुमिका पक्षाच्या वाढीसाठी धोरणात्मक अशी भूमिका होती. त्याचा काँग्रेसच्या पक्ष श्रेष्ठींनी विचार करून निवडणूक कार्यक्रमही आखला आहे. पृथ्वीराज बाबांचा राहुल गांधींना कधीच विरोध नव्हता. परंतु चुकीच्या बातम्या पसरवून बाबांच्या भूमिकेचा अपप्रचार चालवीला जात आहे. सोशल मिडीयावरील ते वृत्त खोडसाळपणाचे आहे, अशी स्पष्टोक्ती कॉंग्रेसचे कऱ्हाड दक्षिणचे अध्यक्ष मनोहर शिंदे यांनी पत्रकाव्दारे केली. (Prithviraj Chavan Latest News)

Prithviraj Chavan Latest News
अरविंद सावंत अन् नवनीत राणांसारख्या निर्लज्ज राजकारण्यांचा धिक्कार; मनसेची टीका

पत्रकामध्ये म्हटले आहे की, माजी मुख्यमंत्री आणि आमदार चव्हाण यांनी शहरात कोट्यावधीची विकासकामे आणली. एका विकासकामाच्या भूमिपूजनासाठी चार ऑगस्ट 2022 रोजी बाबा शहरातील एका कार्यक्रमांस गेले होते. त्यावेळी स्थानिक कार्यकर्त्यांनी जो बॅनर लावला होता त्या जुन्या बॅनरचा आधार घेऊन सोशल मीडिया वर सध्या बाबांबाबत अपप्रचार केला जात आहे. त्यामुळे पसरवलेले वृत्त पूर्णपणे खोडसाळपणाचे व हेतूपुरस्सर आणि संभ्रम निर्माण करणारे आहे,असे स्पष्टीकरणं पत्रकामार्फत केले करण्यात आले आहे.

पत्रकात पुढे म्हटले आहे की, त्या कार्यक्रमानंतर काँग्रेस पक्षाचे अनेक कार्यक्रम बाबांनी पुढाकार घेऊन केलेले आहेत. जिल्ह्यात काढण्यात आलेली तिरंगा यात्रा ही स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त काँग्रेस पक्षाकडून देशभर काढण्यात आली. यामध्ये प्रत्येक जिल्ह्यात किमान 75 किलोमीटर यात्रा आयोजित केली होती. यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात ते स्वतः हजर राहीले. स्वातंत्र्य प्राप्तीसाठी ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी बलिदान दिले त्यांचा इतिहास सगळ्यांना जाहीर कार्यक्रमातून सुद्धा ते सांगत होते. या रॅलीनंतर काँग्रेस पक्षाने दिल्ली येथे आयोजित केलेल्या महागाई विरोधातील रॅलीमध्ये ते काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्यांसोबत सहभागी झाले होते. व्यासपीठावर सर्व नेत्यांच्या सोबत ते उपस्थितही होते. आणि आता सुद्धा 'भारत जोडो' यात्रा जी निघाली आहे. ती यात्रा ज्यावेळी महाराष्ट्रात येईल त्यावेळी बाबा स्वतः या यात्रेत सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

Prithviraj Chavan Latest News
माझ्याकडे बंदूक आहे पण मी गोळीबार केला नाही...

दरम्यान, मध्यंतरीच्या काळात बाबांनी काँग्रेस पक्षाबद्दल जी भूमिका मांडली होती ती पक्षाच्या वाढीसाठी धोरणात्मक अशी होती. त्यांचा काँग्रेसच्या पक्ष श्रेष्ठींनी विचार करून त्याप्रमाणे पक्षांमध्ये निवडणूक कार्यक्रम सुद्धा आखला आहे, असेही सांगण्यात आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com