Kolhapur Shivsena Vs Ambadas Danve : कोल्हापुरात शिंदेंच्या शिवसेनेने अंबादास दानवेंच्या राजीनाम्याची मागणी करत, केलं 'जोडे मारो' आंदोलन!

Kolhapur Shivsena demanded Ambadas Danves resignation : ...तर ते लोकप्रतिनिधी पदाच्या लायक नाहीत. त्यामुळे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी तत्काळ आमदारकीचा राजीनामा द्यावा. अशी मागणी कोल्हापूर शिवसेनेच्यावतीने करण्यात आली आहे.
Kolhapur Shivsena Vs Ambadas Danve
Kolhapur Shivsena Vs Ambadas DanveSarkarnama

Kolhapur Shivsena agitation against Ambadas Danve : विधिमंडळाच्या इतिहासात प्रथमच महिला उपसभापतींच्यासमोर विरोधी पक्षनेत्याकडून लोकप्रतिनिधीला शिवीगाळ करण्याची घटना घडली, या प्रकाराची सर्वच चर्चा सुरू आहे. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याकडून भाजप आमदार प्रसाद लाड यांना सभागृहातच शिवीगाळ झाली. त्याचा सर्व स्तरातून निषेध होत आहे.

कोल्हापुरातही शिवसेनेच्या शिंदे गटाकडून अंबादास दानवे(Ambadas Danve) यांच्या या कृतीचा निषेध करत, त्यांच्या पोस्टरला जोडे मारण्यात आले. कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेनाच्या वतीने ही निदर्शने करण्यात आली.

यावेळी शिवसेना(Shivsena) जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण म्हणाले, सार्वभौम सभागृहात जिथे राज्याची धोरणे ठरविली जातात, जनतेला न्याय देणारे निर्णय घेतले जातात, अशा पवित्र ठिकाणी शिवीगाळ करून गुंडगिरीप्रमाणे अंगावर धावून जाण्याचा प्रकार अखंड महाराष्ट्राने पहिल्यांदाच पाहिला आहे.

Kolhapur Shivsena Vs Ambadas Danve
Ambadas Danve News: अंबादास दानवेंच्या नावावर 'नकोसा' रेकॉर्ड; विधिमंडळाच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडले

तसेच लोकप्रतिनिधी म्हणून लोकांची कामे करणे हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची शिकवण विसरून ठाकरे गटाचे गटनेतेच सभागृहाचा अवमान करत असतील, तर ते लोकप्रतिनिधी पदाच्या लायक नाहीत. त्यामुळे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी तत्काळ आमदारकीचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही केली.

विधिमंडळ सभागृहाचा अपमान करणाऱ्या अंबादास दानवे यांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी बोलताना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण म्हणाले कि, विधिमंडळात जो प्रकार घडला तो अतिशय क्लेशदायी होता.

महिला उपसभापती, महिला लोकप्रतिनिधी असताना शिवीगाळ करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही आणि शिवसेनाप्रमुखांची शिकवणही नाही. यामुळे विधिमंडळाचा अवमान झाला आहे. दानवे यांनी राजीनामा द्यावा.

Kolhapur Shivsena Vs Ambadas Danve
Ambadas Danve 'हा कुठे बाहेर असता, तर 'प्रसाद'च दिला असता'; अंबादास दानवेंची शिवसेना स्टाईल...

यावेळी महानगरप्रमुख शिवाजी जाधव, शहरप्रमुख रणजीत जाधव, महिला आघाडी शहरप्रमुख पवित्रा रांगणेकर, समन्वयक पूजा भोर, यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com