Patan News : निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाच्या निषेधार्थ उद्धव ठाकरे Udhav Thackeray गट शिवसेना आक्रमक झाली असून आज कऱ्हाड -चिपळूण मार्गावर झेंडा चौक पाटण Patan येथे निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात तीव्र निदर्शने करत जोरदार घोषणाबाजी करून निषेध नोंदवला.
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे सातारा जिल्हाप्रमुख हर्षद कदम, जिल्हा संघटक गजानन कदम, उपजिल्हा प्रमुख रवींद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना पाटण तालुका प्रमुख सुरेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात आक्रमक शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत निषेध आंदोलन करण्यात आले.
यावेळी निवडणूक आयोग, मोदी सरकार, शिंदेसेना, विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी तालुका प्रमुख सुरेश पाटील म्हणाले, 1966 साली मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्ष नावाचा वृक्ष लावला. त्याची फळे अनेकांनी खाल्ली मात्र चाळीस गद्दारांनी त्या वृक्षाला नजर लावली. राज्यात गेल्या सहा महिन्यांपासून लोकशाहीला काळींबा फासणारी घटना घडत आहे.
लोकशाही राहणार कि नाही अशी सामान्य माणसाला शंका आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शांत, संयमी, सुसंस्कृत नेतृत्व आहे. मात्र त्यांचे नेतृत्व चाळीस गद्दारांना खटकले आणी शिवसेना फोडण्याचा कट रचला, अगोदर आमदार खासदार चोरले आता शिवसेना पक्षाचे नाव व निशान चोरले. मात्र या चाळीस गद्दारातील एकपण निवडून आला तर पक्षाचे पदाधिकारी म्हणवून घेणार नसल्याच्या तीव्र भावना सुरेश पाटील यांनी व्यक्त केल्या. यावेळी राजेंद्र पाटणकर, राजाभाऊ जगदाळे यांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला.
यावेळी शहर प्रमुख शंकरराव कुंभार, उपतालुकाप्रमुख भरत पवार, मोरणा विभाग प्रमुख उस्मान भाई शेख, संघटक संजय पवार, संतोष साळुंखे, ज्येष्ठ शिवसैनिक उत्तम भाऊ मगर, राजाभाऊ जगदाळे, तुकाराम देसाई, पाटण शहर प्रमुख शंकर कुंभार, शहर संघटक अभिजीत यादव, उपशहर प्रमुख सतीश कुंभार व उपविभाग प्रमुख अरविंद लोहार, अजय पवार, शामराव सावंत, राजेंद्र पाटणकर, दगडू कोळेकर, किरण शिर्के यांच्यासह तालुक्यातील शिवसैनिक उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.