

धक्कादायक आणि थरारक घटना समोर आली असून एका भाजप नेत्याच्या कुटुंबावर झालेल्या गोळीबारात तरुणाचा मृत्यू झाला आहे. माजी आमदार मनोज सिंह यांच्या नात्यातील 28 वर्षांचा हर्ष कुमार सिंह याचा या हल्ल्यात मृत्यू झाला, तर त्यांचे मेहुणे चंदन सिंह गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
बिहारमध्ये ही घटना सिवान शहरातील लक्ष्मीपूर-अंदर ढाला उड्डाणपुलाजवळ घडली. मिळालेल्या माहितीनुसार, चंदन सिंह आणि त्यांचा मुलगा हर्ष हे रस्त्याच्या कडेला गाडी उभी करण्यासाठी थांबले होते. त्याच वेळी समोरून वेगाने येणाऱ्या एका कारने त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. या अपघातानंतर दोन्ही बाजूंमध्ये तीव्र वाद झाला.
वाद काही क्षणांतच चिघळला आणि समोरच्या गटातील लोकांनी अचानक गोळीबार सुरू केला. या गोळीबारात हर्ष आणि चंदन सिंह गंभीर जखमी झाले आणि रस्त्यावरच कोसळले. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तात्काळ पोलिसांना कळवले. पोलिसांनी त्वरीत घटनास्थळी पोहोचून दोघांना रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी हर्ष कुमार सिंह याला मृत घोषित केले, तर चंदन सिंह यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.
या प्रकरणात पोलिसांनी वेगाने तपास करत आरोपीचा शोध लावला. छोटू कुमार यादव असे आरोपीचे नाव असून तो हाथोडा गावचा रहिवासी असल्याचे समोर आले आहे. गुरुवारी पहाटे सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी त्याला अटक करण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न करत पोलिसांवर गोळीबार केला.
यानंतर पोलिसांनी प्रत्युत्तरात कारवाई करत आरोपीला जखमी केले. या कारवाईत त्याच्या दोन्ही पायांना गोळ्या लागल्या. सध्या आरोपीला सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून पुढील उपचारासाठी त्याला पाटणा येथे हलवण्यात आले आहे.
या संपूर्ण घटनेमुळे सिवान परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.