Pune Graduates Constituency: पुणे पदवीधरचा उमेदवार जाहीर! भाजपनं अजित पवार, मुश्रीफांसह, भैय्या मानेंचे मनसुबे उधळले

Pune Graduates Constituency Election : सांगलीचे पालकमंत्री अन् राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही घोषणा केली आहे.
Chandrakant Patil
Chandrakant Patil Sarkarnama
Published on
Updated on

Pune Graduates Constituency Election : पुणे पदवीधर मतदार संघासाठी महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपl रस्सीखेच सुरू आहे. अशातच भाजपने विद्यमान आमदार अरुण लाड यांचे चिरंजीव शरद लाड यांना पक्षात घेऊन उमेदवारीचा शब्द दिला. त्यानंतर आता सांगलीचे पालकमंत्री अन् राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनीच लाड यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे. ताकाला जाऊन मोगा लपवण्यात काय अर्थ नाही, असे म्हणत मंत्री पाटील यांनी पुणे पदवीधरचे भावी उमेदवार असा शरद लाड यांचा उल्लेख करत एक प्रकारे उमेदवाराची घोषणाच केली. सांगली जिल्ह्यातील पलूस येथे आयोजित भाजप कार्यालय आणि पक्षप्रवेशाच्या मेळाव्यात ते बोलत होते.

Chandrakant Patil
Top 10 News: धक्क्यावर धक्के सहन केलेल्या काँग्रेससाठी मोठी दिलासादायक बातमी ते रोहित आर्याचं पुणे कनेक्शन, माणूस नेमका कसा होता?

पुणे पदवीधर मतदारसंघासाठी महायुती मधील सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. वास्तविक राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडे विद्यमान आमदार अरुण लाड आहेत. तर महायुतीमध्ये ही जागा भाजपकडे आहे. भाजपच्या या जागेवर राष्ट्रवादीने आतापासूनच दावा केला आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी भैय्या माने हा अश्वमेध सोडल्याचे जाहीर केले होते. तर दुसरीकडे भाजपकडून आमदार अरुण लाड व यांचे भाजपमध्ये घेऊन त्यांचे चिरंजीव शरद लाड यांना भाजपमध्ये घेऊन त्यांना उमेदवारी देण्याचा शब्द देण्यात आला होता.

Chandrakant Patil
Rohit Aarya: रोहित आर्याचं पुणे कनेक्शन, माणूस नेमका कसा होता? शेजाऱ्यांनी दिलेली माहिती ऐकून चक्रावून जाल

मागील दोन निवडणुकीचा निकाल काय?

पुणे पदवीधर मतदारसंघातून २०१४ दरम्यान झालेल्या निवडणुकीत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील विरुद्ध राष्ट्रवादीकडून माजी खासदार श्रीनिवास पाटील यांचे चिरंजीव सारंग पाटील यांच्यात लढत झाली होती. मात्र उमेदवारी न मिळाल्यानं आमदार अरूण लाड यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली होती. पण या निवडणुकीत चंद्रकांत पाटील विजयी झाले होते. त्यांना ६२ हजारांच्या आसपास मतदान झाले होते, तर सारंग पाटील यांना ५९ हजारांच्या वर मतदान झाले. तर तर अरुण लाड यांना २५ हजार इतके मते मिळाली होती. अवघ्या २ हजारांच्या फरकाने भाजपाने ही जागा राखत चंद्रकांत पाटील विजयी झाले होते. विशेषत: म्हणजे अरूण लाड यांनी घेतलेली २५ हजारांहून अधिक मते लक्षणीय होती, त्यामुळे लाड यांच्या बंडखोरीचा फटका बसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला पुणे पदवीधर मतदारसंघात बसला होता.

Chandrakant Patil
Sangli News: सुधीर गाडगीळांच्या 'लेटर बॉम्बला' चंद्रकांतदादांनी भेटूनच दिलं उत्तर; एकाच वाक्यात केलं शांत!

तर २०२० च्या पुणे पदवीधर मतदार संघात काँग्रेस-राष्ट्रवादीकडून आमदार अरुण लाड तर भाजपकडून संग्राम देशमुख अशी लढत झाली. लाड यांनी 1 लाख 22 हजार 145 मते घेतली. तर देशमुख यांना 73 हजार 321 मते मिळाली. 48 हजार 824 मतांनी बीजेपीचे संग्राम देशमुख यांचा पराभव केला आहे. त्यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी एकत्र होते. आमदार सतेज पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, जयंत पाटील यांची मोठी ताकद लाड यांच्या मागे होती. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com