Shambhuraj desai On Dhangekar : पुरावे न देता धंगेकरांची स्टंटबाजी; त्यांनी पुरावा द्यावा...शंभूराज देसाईंचे प्रत्युत्तर !

Pune Hit And Run Case : बांधकाम व्यावसायिकाच्या मद्यधुंद अल्पवयीन मुलाने भरधाव वेगाने गाडी चालवित दुचाकीला धडक दिली होती. यामध्ये दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत यातील आरोपींना अटक करण्यास सुरूवात केली आहे.
Shambhuraj desai - Ravindra Dhangekar
Shambhuraj desai - Ravindra DhangekarSarkarnama

Satara News : काँग्रेसचे कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागावर आरोप करताना कोणताही पुरावा दिलेला नाही. त्यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांनी ते शासनाच्या कोणत्याही विभागाकडे द्यावेत. मी या विभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर सर्वात जास्त कारवाई केल्या आहेत. त्यामुळे आमदार धंगेकर यांनी वस्तुस्थिती जाणून घेण्याची गरज आहे.

या प्रकरणात विरोधी पक्ष मीडियाला घेऊन स्टंटबाजी करण्याचे काम करत आहे, असा आरोप राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी सोमवारी केला आहे. धंगेकर यांच्याकडे त्यांनी केलेल्या आरोपांचे पुरावे असतील तर त्यांनी ते द्यावेत, असे आव्हानच देसाई यांनी दिले आहे. यामुळे येणाऱ्या काळात परमिट रूम, बार, पब च्या विषयावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी अधिकच झडणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

कल्याणीनगर येथे झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग चांगलाच चर्चेत आला आहे. बांधकाम व्यावसायिकाच्या मद्यधुंद अल्पवयीन मुलाने भरधाव वेगाने गाडी चालवित दुचाकीला धडक दिली होती. यामध्ये दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांनी (Police) कारवाई करत यातील आरोपींना अटक करण्यास सुरूवात केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Shambhuraj desai - Ravindra Dhangekar
Mohol News : मोठी बातमी : कोर्टाचा माजी आमदार रमेश कदम, शरद कोळींसह 72 जणांना मोठा दणका; सुनावली 'ही' शिक्षा

राज्य उत्पादन शुल्क विभागाबाबत आमदार धंगेकर यांनी केलेल्या आरोपाला मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी प्रतुत्तर दिले आहे. मंत्री देसाई म्हणाले, या प्रकरणात काही तथ्य आहे का? याचे तपास करण्याचे आदेश दिले आहेत. धंगेकरांनी वस्तुस्थिती जाणून घेण्याची गरज आहे. उत्पादन शुल्क विभागात असला कुठल्याही प्रकार होत नाही. गेल्या दोन दिवसांत तब्बल 49 दुकानांवर आमच्या विभागाने कारवाई केली आहे. धंगेकर यांनी आरोप करताना कोणताही ठोस पुरावा दिलेला नाही.त्यांच्याकडे पुरावा असेल तर त्यांनी तो शासनाच्या कोणत्याही विभागाकडे द्यावा.

मी या विभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर सर्वात जास्त कारवाई केल्या आहेत. सुषमा अंधारे यांनी माझं नाव जोडलं होत. त्याची आजही प्रक्रिया चालू आहे. माझी नाहक प्रतिमा बदनाम करण्याचे काम त्यांचे सुरू आहे. विरोधी पक्ष मीडियाला घेऊन स्टंटबाजी करण्याचे काम करत आहे. यापूर्वीच्या काळात किती कारवाया झाल्या आणि मी आल्यावर दुपटीने झाल्या हे खरे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.आगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठी जागा वाटपाबाबत महायुतीचा काय फॉर्मूला असेल, यावर ते म्हणाले, विधानसभेचा जागेसाठी तिन्ही नेते एकत्र येऊन निर्णय घेतील.

Shambhuraj desai - Ravindra Dhangekar
Pune Hit And Run Case Update : आमदार सुनील टिंगरेंच्या शिफारशीने ब्लड सॅम्पल बदलणारा डॉक्टर झाला होता अधीक्षक !

नक्की काय आहे प्रकरण

राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकारी कारवाई करत नसल्याचा आरोप काँग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर, शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला होता. राज्य शुल्क विभागाच्या अधीक्षकांच्या केबिनमध्ये जात सोमवारी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी वसुलीची यादीच वाचून दाखवली. पुणे शहर आणि परिसरातील 70 पब, 30 ढाबे, 32 बिअर शॉपी आणि काही वाइन शॉपींकडून उत्पादन शुक्ल खात्याचे अधिकारी प्रत्येकी पन्नास हजार ते दीड लाखांपर्यंत रूपयांची वसुली करत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. या विभागाच्या नेत्यांना यामधून महसूल मिळत असल्याने कोणतीही कारवाई केली जात नसल्याचा आरोपही करण्यात आला होता.

(Edited by : Chaitanya Machale)

Shambhuraj desai - Ravindra Dhangekar
Ajit Pawar News : 'कल्याणीनगर' प्रकरणात पोलिसांना फोन केला होता? अजित पवार म्हणाले, 'दोषी असेल तर मलाही...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com