Rohit Pawar In Vikhe Patil's Cabin: रोहित पवार राधाकृष्ण विखेंच्या 'केबिन'मध्ये काय आहे कारण ?

Rohit Pawar News: रोहित पवार राधाकृष्ण विखेंच्या 'केबिन' काय आहे कारण ?
Rohit Pawar With Radhakrishna Vikhe Patil
Rohit Pawar With Radhakrishna Vikhe PatilSarkarnama

राजेंद्र त्रिमुखे

Ahmednagar : राष्ट्रवादीचे नेते, कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार मागच्या काही दिवसांपासून कर्जत MIDC प्रश्नावर आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं आहे. कर्जतच्या पाटेवाडीमध्ये 'एमआयडीसी' प्रकल्प येणार आहे. मात्र, या संदर्भात ठोस पावलं उचलली जात नसल्याने रोहित पवार आक्रमक झाले आहेत. आपल्या पहिल्याच टर्ममध्ये मतदारसंघातील स्थगिती मिळालेल्या प्रलंबित कामांच्या मंजुरीसाठी रोहित पवार त्यांची बाजू विविध व्यासपीठावर मांडत आहेत. याच बरोबर आपल्या मतदारसंघासह राज्यातील विविध प्रश्नांवर मार्ग निघावा यासाठी ते महायुती सरकारमधील मंत्र्यांना भेटत आहेत.

Rohit Pawar With Radhakrishna Vikhe Patil
Ajit Pawar Sit On CM Chair : ...अन् विधानसभा अध्यक्षांनीच अजित पवारांना मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसवले

सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात रोहित पवारांनी केवळ उपमुख्यमंत्री अजित पवारच नव्हे तर महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांचीही भेट घेत विविध प्रलंबित विषयावर चर्चा करून मार्ग काढण्याची विनंती केली. विशेष म्हणजे त्यांना अजितदादा आणि विखे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे रोहित पवार यांनी सांगितले आहे. कर्जत-जामखेड 'एमआयडीसी' अधिसूचना मंजुरीसाठीही उद्योगमंत्री उदय सामंत यांची ते सातत्याने भेट घेत सभागृहात आग्रही मागणी करत आहेत.

अजितदादां-विखेंकडे केल्या या मागण्या:

  • १० हजारापेक्षा जास्त कंत्राटी समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांना सेवेत कायम करणं..

  • पोलिस शिपाई (चालक) भरती २०१९ मधील उमेदवारांना मॅट न्यायाधिकरणाच्या आदेशानुसार नियुक्ती देणं..

  • महापारेषण सहाय्यक तंत्रज्ञ पदाच्या भरतीसाठी वायरमन ट्रेडच्या विद्यार्थ्यांनाही पात्र करावे..

  • राज्य माहिती आयोगातील कंत्राटी पध्दतीने कार्यरत असलेली वर्ग-३ आणि वर्ग ४ ची पदे बाह्ययंत्रणेमार्फत न भरता प्रचलित पध्दतीप्रमाणेच भरण्याची मागणी..

  • हळगांव (ता. जामखेड) इथं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषी महाविद्यालयाच्या परिसरात पशु महाविद्यालय मंजूर करण्याची विनंती..

  • कर्जतप्रमाणेच जामखेडमध्येही सर्व सरकारी कार्यालये एकाच इमारतीत असावीत यासाठी मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीला मंजुरी देण्याची मागणी..

Rohit Pawar With Radhakrishna Vikhe Patil
Shivsena 16 Mla Disqualification : सोळा आमदार अपात्रतेची सुनावणी कधी ? सुप्रीम कोर्टानं दीड महिना...

अजित पवार शिंदे- फडणवीस गटामध्ये सामील झाले असले, रोहित पवार विविध प्रश्नांच्या कामासाठी अनेकदा भेटत त्यांना भेटत आहेत. "दादांना मुख्यमंत्रीपदी त्यांचा पुतण्या म्हणून पाहायला नक्कीच आवडेल. मात्र, एक नागरिक म्हणून ते ज्या विचारांविरोधात आतापर्यंत लढले त्याच विचारांच्या लोकांसोबत जाऊन उपमुख्यमंत्री होणार असतील तर काहीसे दुःख होईल," असे मत रोहित पवारांनी व्यक्त केले होते.

Edited By - Rashmi

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com