महसूल मंत्री विखेंनी केली वाळू तस्करी करणाऱ्या बोटींवर कारवाई

राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील ( Radhakrishna Vikhe Patil ) नेवासे तालुक्यात नुकसानग्रस्त शेतपीकाची पाहणी करत होते.
Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe PatilParesh Kapase
Published on: 
Updated on: 

Radhakrishna Vikhe Patil : राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील ( Radhakrishna Vikhe Patil ) नेवासे तालुक्यात नुकसानग्रस्त शेतपीकाची पाहणी करत होते. अचानक मंत्र्यांची मोटार एका वस्तीवर गेली. जिल्हाधिकारी व तालुका प्रशासन गोंधळून गेले. वस्तीवर असलेल्या वाळू उपसा करणाऱ्या दोन बोटीकडे बोट दाखवत मंत्र्यानी हे काय आहे, असा खडा सवाल विचारत मालकासह सर्वांवर तातडीने कारवाईचे आदेश देण्यात आले.

टाकळीभान(ता.श्रीरामपूर) येथील नुकसानीची पाहणी केल्यानंतर विखे-पाटील यांनी वरखेड, शिरसगाव व प्रवरासंगम भागात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या सोयाबीन, कपाशी पीकाची पाहणी केली. यावेळी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठल लंघे, भाजपचे जिल्हा संघटन सरचिटणीस नितीन दिनकर, तालुकाध्यक्ष भाऊसाहेब फुलारी, युवा मोर्चाचे प्रताप चिंधे, दत्तात्रेय काळे, अंकुश काळे उपस्थित होते.

Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe Patil : खरी शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची

प्रवरासंगम येथून मंगळापूरला जात असताना विखे-पाटील यांना एका वस्तीवर वाळू उपासा करणा-या दोन बोटी दिसल्या नंतर त्यांनी ताफ्याला घेवून वस्ती गाठली. अधिकारी व तेथील ग्रामस्थांची चांगलीच तारांबळ उडाली. जागेवर त्यांनी प्रांताधिकारी व तहसीलदार यांना कारणे दाखवा नोटीस काढण्याचा आदेश करुन ज्यांच्या जागेत बोटी आहेत. त्यांच्यावर अगोदर गुन्हा दाखल करण्याचे त्यांनी पोलीसांना सांगितले.

Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe Patil : मागील अडीच वर्षात राज्याचा विकास 25 वर्षांनी मागे गेला

मंगळापूर हद्दीतील नदीतून वाळू उपसा होत असल्याच्या अनेक तक्रारी जागृत ग्रामस्थांनी तहसील कार्यालयाकडे यापुर्वी केलेल्या आहेत. स्थानिक तलाठ्यास सुध्दा काही युवकांनी माहिती दिली होती. महसूल मंत्र्याच्या कारवाईत आता कोण कोण अडकतात याकडे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Gokul Elections | Gokul New Chairman
Raju Shetti
Shivendraraje Bhosale-Dr. Sanjay Kade
Gokul Mahayuti Meeting Devendra Fadnavis