Shetkari Sanghatna News: रघुनाथदादांचे निमंत्रण अन् के. चंद्रशेखर राव पुन्हा सांगलीत

K. Chandrashekhar Rao Maharashtra Visit : मुख्यमंत्री के. चंद्रशेखरराव बुधवारी पुन्हा एकदा इस्लामपूर दौऱ्यावर येणार आहेत.
Shetkari Sanghatna News:
Shetkari Sanghatna News:Sarkarnama
Published on
Updated on

Sangli Politics : कोल्हापूर आणि सांगलीचा दौरा झाल्यानंतर तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखरराव बुधवारी पुन्हा एकदा इस्लामपूर दौऱ्यावर येणार आहेत. आठ दिवासांपूर्वी म्हणजेच 1 ऑगस्टलाच ते इस्लामपूर, वाटेगावमध्ये आले होते. त्यानंतर ते उद्या पुन्हा सांगलीत येत आहेत. आठवड्याभरातला हा दुसरा दौऱा असल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

भारत राष्ट्र समितीचे प्रमुख आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव उद्या इस्लामपूरममध्ये शेतकरी संघटनेचे रघुनाथदादा पाटील यांनी आयोजित केलेल्या शेतकरी परिषद आणि सन्मान सोहळ्यासाठी चंद्रशेखर राव सांगली दौऱ्यावर येत आहे .

Shetkari Sanghatna News:
K Chandrashekar Rao: आम्हाला भाजपची 'बी टीम' म्हणणाऱ्या पवारांच्या पक्षाची अवस्था काय? के.चंद्रशेखर राव यांचा पलटवार

या मेळाव्यावेळी जोरदार शक्ती प्रदर्शन केले जाणार आहे. या मेळाव्याला सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यातील कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. दुपारी 1 ते 3 यावेळेत हा मेळावा होणार आहे. यावेळी राज्यातील शेतकऱ्याकडून के. चंद्रशेखरराव यांचा सत्कार करण्यात येणार आहे. अवघ्या नवव्या दिवशी पुन्हा एकदा दौरा काढल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

गेल्या आठवड्यातच रघुनाथदादा पाटील यांनी ९ ऑगस्टला शेतकरी शेतकरी परिषद आणि सन्मान कार्यक्रमाची घोषणा केली होती. या कार्यक्रमानिमित्तच चंद्रशेखर राव पुन्हा एकदा सांगली दौऱ्यावर ते आहेत. या मेळाव्याच्या तयारीला सुरूवात झाली असून मुख्यमंत्री राव यांच्या सांगली दौऱ्याचीही त्यांनी घोषणाही केली आहे. उद्या दुपारी १ ते ३ या कालावधीत हा कार्यक्रम होणार आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर रघुनाथ दादा पाटील आणि के. चंद्रशेखरराव बोलणार आहेत.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com