Solapur Lok Sabha : प्रणिती शिंदे-राम सातपुतेंसाठी काँग्रेस-भाजपचे सर्वोच्च नेते घेणार सोलापुरात सभा

Loksabha Election 2024 : सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे आणि भाजपचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्यामध्ये जोरदार लढाई सुरू आहे. सातपुते यांच्यासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 30 एप्रिल रोजी सभा घेणार आहेत, तर प्रणिती शिंदे यांच्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी हे सोलापुरात येत्या 24 तारखेला सभा घेणार आहेत.
Rahul Gandhi-Praniti Shinde-Ram Satpute-Narendra Modi
Rahul Gandhi-Praniti Shinde-Ram Satpute-Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 22 April : सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे आणि भाजपचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्यामध्ये जोरदार लढाई सुरू आहे. सातपुते यांच्यासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 30 एप्रिल रोजी सभा घेणार आहेत, तर प्रणिती शिंदे यांच्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी हे सोलापुरात येत्या 24 तारखेला सभा घेणार आहेत, त्यामुळे शिंदे-सातपुतेंसाठी आपले सर्वोच्च नेते सोलापूरचे प्रचाराचे मैदान गाजवणार आहेत.

सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी (Solapur Lok Sabha Constituency) काँग्रेसकडून प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांची उमेदवारी निवडणूक जाहीर होण्याआधीच निश्चित करण्यात आली होती. त्या दृष्टीने त्यांनी निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच मतदारसंघात प्रचाराची एक फेरी पूर्ण केली होती. त्या तुलनेत भाजपची उमेदवारी थोडी उशिरा जाहीर झाली आहे. सोलापूर मतदारसंघात दोन तरुण आमदारांमध्ये तुल्यबळ लढाई होत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Rahul Gandhi-Praniti Shinde-Ram Satpute-Narendra Modi
Congress Party News : काँग्रेस नेत्यांचा ‘सुंभ जळाला तरी पीळ काही सुटेना’!

सुशीलकुमार शिंदे यांचा सोलापूरमध्ये 2014 आणि 2019 च्या निवडणुकीत पराभव झाला आहे. वडिलांच्या पराभवाचे उट्टे काढण्यासाठी प्रणिती शिंदे या मैदानात उतरल्या आहेत. या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार तितकासा ताकदवान उमेदवार नाही, तसेच, एमआयएमनेही सोलापूरमध्ये उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे मागील निवडणुकीप्रमाणे मतविभागणीचा फटका काँग्रेसला (Congress) बसण्याची शक्यता कमी आहे.

प्रणिती शिंदे यांच्यासाठी सुशीलकुमार शिंदे यांनी आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. काँग्रेस पक्षाकडूनही पाठबळ मिळत आहे, त्यातूनच प्रणिती शिंदे यांच्यासाठी राहुल गांधी यांची येत्या बुधवारी (ता. 24 एप्रिल) सोलापूरध्ये प्रचार सभा होणार आहे. या सभास्थळाची माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी पाहणी केली. सुशीलकुमार शिंदे हे स्वतः काळजीपूर्वक लक्ष घालून सभेचे नियोजन करत आहेत.

Rahul Gandhi-Praniti Shinde-Ram Satpute-Narendra Modi
Kolhapur Lok Sabha 2024 : कोल्हापूरची निवडणूक सोशल मीडियावरही तापली; मंडलिक-शाहू महाराज समर्थकांंमध्ये ‘सोशल वॉर’

दुसरीकडे, काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्याशी भाजप उमेदवार राम सातपुते (Ram Satpute) हे कडवी टक्कर देत आहेत. सोलापुरात भाजपच्या विजयाची हॅट्‌ट्रिक करण्यासाठी भाजपचे (BJP) पदाधिकारी कामाला लागले आहेत. त्यातूच सातपुते यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची सभा होणार आहे. येत्या 30 एप्रिल रोजी मोदी यांची मरीआई चौकातील भंडारी मैदानावर सभा होणार आहे.

R.

Rahul Gandhi-Praniti Shinde-Ram Satpute-Narendra Modi
Madha Loksabha : माढ्याच्या उमेदवारीचा शब्द शरद पवारांनी ऐनवेळी फिरवला; लक्ष्मण हाकेंचा आरोप

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com