
BJP Government and Indian Muslims : कतारचे अमीर शेख तमीम बिन हमद अल थानी हे भारत दौऱ्यावर आहेत. सोमवारी पंतप्रधान मोदींनी त्यांचे विमानतळावर अतिशय उत्साहाने स्वागत केले. यादरम्यान आता समाजवादी पार्टीने मोदींवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्र समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अबू आझमी यांनी म्हटले की, पंतप्रधा मोदी जगभरातील मुस्लिमशेख किंवा अमीर यांची गळाभेट घेतात, मग देशातील मुस्लिमांबाबतच एवढा द्वेष का? मग हे काय जगातील मुस्लिम देशांना दाखवण्यापुरतेच आहे? याचबरोबर अबू आझमीने आणखी काही मुद्य्यांवरही प्रतिक्रिया दिली.
अबू आझमी(Abu Azmi) यांनी म्हटले की, तेलंगणा सरकार रमजान महिन्यात मुस्लिम कर्मचाऱ्यांना कामाच्या वेळेत सूट देवून लवकर घरी जाण्यास परवानगी देत आहे. या निर्णयाचे स्वागत केले पाहीजे. मुस्लिमांना जरासा दिलासा मिळाला तर भाजपला नेहमीच त्रास झालेला आहे. काही चांगलं घडलं तर त्यांचं पोट दुखतं. नवरात्रीत हिंदू संपूर्ण दिवस उपाशी राहत नाहीत, परंतु रमजानमध्ये मुस्लिम राहतात.
याशिवाय आझमी यांनी म्हटले की, आता मार्चमध्ये विधानसभा सत्र सुरू होत आहे. मला वाटतं मुख्यमंत्री फडणवीसांनी(Fadnavis) तेलंगणा सरकारच्या निर्णयांचे अनुकरण केले पाहीजे आणि सत्र लवकर संपवून आम्हाला दिलासा द्यावा. ही आमची मागणी आहे. हिंदूंनाही नवरात्रीमध्ये सवलत द्यावी, आम्हाला त्यात काय अडचण आहे?
तसेच अबू आझमी यांनी लव्ह जिहाद(Love Jihad)च्या मुद्य्यावरही प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटले की, अशी कोणतीही गोष्ट नाही. जर एखादा मुलगा किंवा मुलगी एकमेकांशी प्रेम करत असतील, तर त्यांना विवाहासाठी परवानगी मिळाली पाहीजे. आता तर मुलगाच मुलाशी देखील विवाह करत आहे. त्याचप्रमाणे मुलगी मुलीशी विवाह करत आहे. देशाचा कायदा तरुणांना जीवनसाथी निवडण्याचा अधिकार देतो.
एवढच नाहीतर आझमी यांनी हेही सांगितले की, सध्याचे भाजप सरकार लव्ह जिहादमधील प्रकरणात मुस्लिमांना फसवेल. त्यामुळेच मी मुस्लिम तरुणांना आवाहन करतो की गैर मुस्लिमशी विवाह करू नका. नाहीतर भाजप(BJP) तुरुंगात पाठवून मुस्लिम आयुष्य उध्वस्त करेल. भाजप नेते उगाचच मशिदींमध्ये लागलेल्या लाउडस्पीकरवरून वाद निर्माण करत आहेत. ते केवळ मुस्लिमांना त्रास देवू इच्छित आहेत.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.