Rahul Patil : करवीरचा उत्तराधिकारी ठरला! पी. एन. पुत्र राहुल पाटील विधानसभेच्या आखाड्यात

Kolhapur Vidhansabha Constituency : आगामी विधानसभा निवडणूक तीन महिन्यांवर येऊन ठेपली आहे. कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे.
Rahul Patil
Rahul PatilSarkarnama

Kolhapur Politics : करवीर विधानसभा मतदारसंघाचे दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांच्या निधनानंतर करवीरचा राजकीय वारसदार आता ठरला आहे. आमदार पी. एन. पाटील यांचे पुत्र आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल पाटील आगामी विधानसभा निवडणूक लढवतील, असा कार्यकर्त्यांच्या आणि नेत्यांच्या सर्वानुमते निर्णय झाला आहे.

याबाबतची माहिती गोकुळचे (Gokul) माजी अध्यक्ष आणि संचालक विश्वास नारायण पाटील, राहुल पाटील आणि राजेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. राहुल पाटील (Rahul Patil) हे राजकीय वारसदार म्हणून सर्व क्षेत्रात भाग घेतील. राजेश पाटील जिल्हा बँकेतील सर्व गोष्टीत लक्ष केंद्रित करतील असा निर्णयही झाला आहे.

आगामी विधानसभा निवडणूक तीन महिन्यांवर येऊन ठेपली आहे. कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी 23 मे रोजी विधानसभा मतदारसंघाचे आमदारांचे निधन झाले. विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha) पार्श्वभूमीवर करवीर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस आणि आमदार पाटील यांचे राजकीय वारसदार कोण? हे तातडीने निवडण्याची गरज होती.

त्या अनुषंगाने आमदार पी. एन. पाटील (PNPatil) यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांची बैठक रविवारी पार पडली. या बैठकीत करवीर विधानसभा मतदारसंघातील राजकीय वारसदार म्हणून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांना निवडण्यात आले. आगामी विधानसभा निवडणुकीला ते सामोरे जाणार आहेत

Rahul Patil
Rajendra Raut : ‘रवींद्र गायकवाडांना ५५ हजारांचे लीड दिलं; पण विधानसभेला माझा पराभव झाला होता’

आमदार पी. एन. पाटील यांचे निधन झाल्यानंतर कोल्हापूर जिल्हा बँकेतील संचालक पद रिकामी झाले आहे. या संचालक पदावर राहुल पाटील की राजेश पाटील याबाबतचा निर्णय जिल्हा बँकेचे अध्यक्ष आणि कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील हे घेतील.

आमदार पी. एन. पाटील यांनी करवीर विधानसभा क्षेत्रात संघटनात्मक आणि चांगली बांधणी केली आहे. कार्यकर्त्यांचे विचार लक्षात घेऊन त्यांनी दिलेली जबाबदारी मी स्वीकारत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीला मी सामोरे जाणार आहे अशी प्रतिक्रिया पत्रकार परिषदेत राहुल पाटील यांनी दिली.

Rahul Patil
Harshad Kadam: मंत्रिपदाचा राजीनामा शंभूराज देसाईंची स्टंटबाजी; हर्षद कदमांनी उडवली खिल्ली

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com