Maan News : माण, खटावमध्ये जयकुमार गोरे आणणार रेल्वे; सर्व्हे करण्याचे रेल्वेमंत्र्यांचे आदेश

Jaykumar Gore माणमधील या मार्गासाठी रेल्वे मिळाल्यानंतर माण, खटावसाठी दळणवळण सुखकर आणि कमी खर्चाचे होईल.
Ranjitsinh Naik Nimbalkar, Jaykumar Gore, Ashwini Vaishnaw, Rahul kul
Ranjitsinh Naik Nimbalkar, Jaykumar Gore, Ashwini Vaishnaw, Rahul kulsarkarnama
Published on: 
Updated on: 

Maan BJP News : जलसंधारण, एमआयडीसी, पुणे- बंगलोर ग्रीन महामार्गानंतर आता आमदार जयकुमार गोरे यांनी माण, खटाव तालुक्यात प्रवास सुखकर होण्यासाठी ऐतिहासिक प्रकल्प आणण्याची तयारी केली आहे. पुसेगाव - दहिवडी - म्हसवड -माळशिरस - पंढरपूर रेल्वे मार्ग मिळावा अशी मागणी त्यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे आज केली. रेल्वेमंत्र्यांनी या मार्गासाठी सर्व्हे करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

माण तालुक्यातील Maan Taluka दुष्काळी भागाला पाणी मिळावे, म्हणून आमदार जयकुमार गोरे Jaykumar Gore यांनी सुरवातीपासून प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून उरमोडी, तारळी आणि टेंभूचे पाणी दुष्काळी गावांना मिळत आहे. त्यामुळे टॅंकरचे प्रमाण कमी झाले आहे. लवकरच जिहे कठापूर योजना कार्यान्वित होणार आहे.

त्यानंतर माण तालुक्यात मोठ्याप्रमाणात जागा उपलब्ध असल्याने येथे कॉरिडॉर एमआयडीसी केंद्र शासनाच्या माध्यमातून उभारली जाणार आहे. तसेच एमआयडीसीसोबतच पुणे-बंगलोर हा ग्रीन महामार्गही माण, खटाव तालुक्यातून जाणार आहे. त्यामुळे माण, खटाव तालुक्यात विकासाला गती मिळाली आहे. आता या विकासाच्या गतीबराेबरच वेगाने व सुखकर प्रवास करणे शक्य होण्यासाठी नवीन रेल्वे मार्ग माण तालुक्यातून नेण्यासाठी आमदार गोरेंनी प्रयत्न सुरु केले आहेत.

आमदार जयकुमार गोरे यांनी माण, खटाव तालुक्यात प्रवास सुखकर होण्यासाठी ऐतिहासिक प्रकल्प आणण्याची तयारी केली आहे. पुसेगाव - दहिवडी - म्हसवड -माळशिरस - पंढरपूर रेल्वे मार्ग मिळावा अशी मागणी त्यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे आज केली. यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार राहुल कुल आदी उपस्थित होते.

Ranjitsinh Naik Nimbalkar, Jaykumar Gore, Ashwini Vaishnaw, Rahul kul
Satara Congress News : पृथ्वीराज चव्हाणांचं काय चुकलं..? विरोधी पक्ष नेतेपदालाही डावलले...

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सातारा ते पंढरपूर मार्गासाठी सर्व्हे करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. या मार्गासाठी रेल्वे मिळाल्यानंतर माण, खटाव भागासाठी दळणवळण सुखकर आणि कमी खर्चाचे होईल. तालुक्याच्या विकासात हा एक ऐतिहासिक प्रकल्प येणार असल्याचे नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.