Pandharpur Constituency : पंढरपुरात काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार का?; धैर्यशील मोहिते पाटलांचा मोठा खुलासा

Congress vs NCP SP Candidates in Pandharpur: पंढरपूर, सांगोला या दोन मतदारसंघात मैत्रीपूर्णच लढती होतील. माढ्याचे खासदार म्हणून मी पंढरपुरातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचाराला आलो आहे. सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे ह्या त्यांच्या काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी येतील. त्या काहीही वावगं नाही.
Bhagirath Bhalke-Anil Sawant-Dhairyasheel Mohite Patil-Sharad Pawar
Bhagirath Bhalke-Anil Sawant-Dhairyasheel Mohite Patil-Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 06 November : पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघांत महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष या दोन्ही पक्षांचे उमेदवार रिंगणात का आहेत, याची उत्सुकता सोलापूर जिल्ह्याला आहे. त्याबाबत माढ्याचे राष्ट्रवादीचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी मोठा खुलासा केला आहे.

‘ज्या व्यक्तीने शरद पवार साहेबांना फसवलं, त्या व्यक्तीला पंढरपूर-मंगळवेढ्याची जनता मतांच्या माध्यमातून उत्तर देईल, ’ असे विधान केले आहे. त्यामुळे पवारांना कोणी आणि कशाच्या संदर्भात फसवलं, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

पंढरपूर मतदारसंघात (Pandharpur Constituency) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून भैरवनाथ शुगर कारखान्याचे उपाध्यक्ष अनिल सावंत हे निवडणूक लढवत आहेत, तर काँग्रेस पक्षाकडून भगीरथ भालके हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यावरून महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याची चर्चा आहे. त्याबाबत खासदार मोहिते पाटील यांनी प्रथमच भाष्य केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तिकिट सोडून त्यांनी (भगीरथ भालके) पंजाची उमेदवारी आणली. त्यामुळे नाराजी मोठ्या प्रमाणात बघायला मिळाली. काय नेमकं कारण होतं, ते कशामुळं घडलं, असा सवाल खासदार धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) यांना विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना त्यांनी पंढरपुरातील दोन उमेदवारांबाबत स्पष्टीकरण दिले आहे.

Bhagirath Bhalke-Anil Sawant-Dhairyasheel Mohite Patil-Sharad Pawar
Chitra Wagh : ‘बंटीभाऊ, तुमची घंटी कोणी वाजवली, ते अगोदर शोधा’: कोल्हापूरच्या घटनेवरून चित्रा वाघांचा पाटलांना टोला

धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले, ज्या व्यक्तीने शरद पवार साहेबांना फसवलं, त्या व्यक्तीलाच हे प्रश्न विचारले पाहिजेत. ज्या व्यक्तीला शरद पवार यांनी आपल्या नातवासारखं सांभाळलं आणि मोठं केलं. प्रत्येक अडचणीच्या काळात त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले, अशा व्यक्तीने शरद पवारांना दगा देणं, अत्यंत चुकीचं आहे. त्याचं उत्तर पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील जनता देईल. मतदानाच्या माध्यमातून जनता त्यांना त्यांची जागा दाखवेल.

पंढरपूर, सांगोला या दोन मतदारसंघात मैत्रीपूर्णच लढती होतील. माढ्याचे खासदार म्हणून मी पंढरपुरातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचाराला आलो आहे. सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे ह्या त्यांच्या काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी येतील. त्या काहीही वावगं नाही. पंढरपूर, सांगोला मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढत होत आहे, त्यामुळे आम्ही या लढती मैत्रीपूर्णच घेणार आहोत. या काही वैरत्वाच्या गोष्टी नाहीत, असेही स्पष्टीकरण मोहिते पाटील यांनी दिले.

Bhagirath Bhalke-Anil Sawant-Dhairyasheel Mohite Patil-Sharad Pawar
Narsayya Adam Mastar : लोकसभा निवडणुकीत शिंदेंकडून मला पैशाची ऑफर होती; नरसय्या आडम मास्तरांचा गौप्यस्फोट

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सोलापूर जिल्ह्यात लढवत असलेल्या विधानसभेच्या सर्वच सर्व जागा निवडून येतील, असा विश्वासही धैर्यशील मोहिते पाटील यांनी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com