Dilip Dhotre
Dilip Dhotre Sarkarnama

Dilip Dhotre : राजसाहेबांनी, 33 वर्षांच्या एकनिष्ठेची पोचपावती दिली; विधानसभेची उमेदवारी जाहीर होताच दिलीप धोत्रेंची प्रतिक्रिया

Pandharpur Assembly Candidacy : माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी राज ठाकरेंचे आभार मानतो. त्यांचा आशीर्वाद कायम माझ्या पाठीशी राहिलेला आहे. राजसाहेबांच्या विश्वासाला मी शंभर टक्के पात्र राहण्याचा प्रयत्न करेन, असेही धोत्रे यांनी नमूद केले.
Published on

Solapur, 05 August : पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल राज ठाकरे यांचे आभार मानतो.

राज ठाकरेंसोबत मी गेली 33 वर्षे काम करतो आहे आणि राजसाहेबांनी त्याचीच मला उमेदवारीच्या माध्यमातून पोचपावती दिली आहे, अशा शब्दांत पंढरपूरमधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून उमेदवारी जाहीर झालेले दिलीप धोत्रे यांनी प्रतिक्रिया दिली.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज सोलापूर जिल्ह्यातील विधानसभेच्या ११ मतदारसंघाचा आढावा घेतला. त्यादरम्यान राज यांनी मनसेच्या दोन उमेदवारांची घोषणा केली. त्यात मुंबईतील शिवडी मतदारसंघातून बाळा नांदगावकर, तर पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून दिलीप धोत्रे (Dilip Dhotre) यांची नावे ठाकरेंनी जाहीर केली आहेत. त्यानंतर पंढरपूरचे मनसेचे उमेदवार धोत्रे यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

मनसेकडून पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेसाठी माझी उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल अतिशय आनंद झाला आहे. माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी राज ठाकरेंचे आभार मानतो. त्यांचा आशीर्वाद कायम माझ्या पाठीशी राहिलेला आहे. राजसाहेबांच्या विश्वासाला मी शंभर टक्के पात्र राहण्याचा प्रयत्न करेन, असेही दिलीप धोत्रे यांनी नमूद केले.

Dilip Dhotre
Hasan Mushrif : मुश्रीफांना भलताच कॉन्फिडन्स; ‘मीच होणार पुन्हा कागलचा आमदार अन्‌ मंत्रिमंडळातही असणार’

राज ठाकरेंसोबत मी गेली 33 वर्षे काम करतो आहे. राजसाहेबांनी त्याचीच मला पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाच्या उमेदवारीच्या माध्यमातून पोचपावती दिली आहे. राज ठाकरेंनी माझ्यावर टाकलेल्या विश्वासाला मी कदापि तडा जाऊ देणार नाही.

अडचणीच्या काळात कुठला पक्ष, कुठला नेता जनतेच्या मदतीसाठी धावून गेला आहे. हे सर्व त्या मतदारांना आणि जनतेला माहिती आहे, त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उमेदवार पंढरपूर-मंगळवेढ्यातून निश्चितपणे विजयी होईल, असे दिलीप धोत्रे यांनी सांगितले.

Dilip Dhotre
MNS First Candidate : राज ठाकरेंनी भाजपविरोधात शड्डू ठोकला; पंढरपूर-मंगळवेढ्यातून एकनिष्ठ नेत्याची उमेदवारी जाहीर

कोण आहेत दिलीप धोत्रे?

राज ठाकरेंचे एकनिष्ठ सैनिक म्हणून दिलीप धोत्रे यांची ओळख आहे. राज ठाकरेंनी शिवसेना सोडल्यानंतर धोत्रे हेही त्यांच्यासोबत राहिले होते. मनसेची स्थापना केल्यानंतर दिलीप धोत्रे यांच्याकडे मनसे विद्यार्थी सेनेचे प्रमुखपद देण्यात आले होते. तसेच, मनसे सहकार आघाडीचे प्रदेशाध्यक्ष म्हणूनही दिलीप धोत्रे काम पाहत आहेत. नागपूरचे निवडणूक प्रभारी म्हणून राज ठाकरेंनी दिलीप धोत्रे यांची नियुक्ती केली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com