Sushilkumar Shinde-Dilip Mane-Praniti Shinde
Sushilkumar Shinde-Dilip Mane-Praniti ShindeSarkarnama

Praniti, Sushilkumar Shinde : मानेंना ताकद देण्याचा सुशीलकुमार अन्‌ प्रणितींचा शब्द; पण ‘त्या’ चुकीचीही करून दिली जाणीव!

Dilip Mane News : दिलीप माने यांनी पूर्वीची चूक सुधारून पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. पूर्वीप्रमाणे आता गटतट राहिले नाहीत. चांगल्या विचाराचे लोक काँग्रेसमध्ये आले की यश मिळते, असा दावाही त्यांनी केला.
Published on

Solapur, 03 August : माजी आमदार दिलीप माने यांनी पूर्वी केलेली चूक सुधारली आणि लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

काँग्रेसमध्ये आता पूर्वीप्रमाणे गटतट राहिले नाहीत, त्यामुळे आगामी ऑक्टोबरमध्ये यश तुमचेच आहे, त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा, असे म्हणत खासदार प्रणिती शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी शुभेच्छा देताना मानेंना काँग्रेस सोडल्याची जाणीवही करून दिली.

खासदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांच्यानंतर माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde)यांनीही दिलीप माने यांना विधानसभा निवडणुकीसाठी पाठिंबा दर्शविला. तसेच, शिंदे कुटुंबीय मानेंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, असा शब्दही शिंदेंनी मानेंना दिला.

दक्षिण सोलापूरचे माजी आमदार दिलीप माने यांचा वाढदिवसानिमित्त माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, खासदार प्रणिती शिंदे, उज्वला शिंदे यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभाला माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे, राजन पाटील, प्रकाश यलगुलवार, सिद्धेश्वर परिवाराचे प्रमुख धर्मराज काडादी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, सुरेश हसापुरे आदी प्रमुख नेते उपस्थित होते.

प्रणिती शिंदे म्हणाल्या, आगामी ऑक्टोबरमध्ये यश तुमचेच आहे, त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. काँग्रेसच्या लाडक्या बहिणीकडून, भाजपची लाडकी बहीण नाही. काँग्रेसची लाडकी बहीण म्हणून दिलीप माने यांना शुभेच्छा देते. वय कितीही असो, पण ते दिसायला नाही पाहिजे.

Sushilkumar Shinde-Dilip Mane-Praniti Shinde
Devendra Fadnavis : सचिन वाझेच्या देशमुखांबाबतच्या ‘त्या’ पत्रावर फडणवीसांचा नवा स्टॅंड; ‘...तर निश्चित चौकशी होईल’

दिलीप माने हे 62 वर्षांचे वाटत नाहीत. कारण त्यांना केव्हाही कॉल करू द्या, ते पहिल्या रिंगला कॉल उचलतात. दिलीप माने यांची जीवनशैली चांगली असल्याने ते अजूनही तरुण दिसतात, असेही प्रणिती शिंदे यांनी म्हटले आहे.

दिलीप माने यांनी पूर्वीची चूक सुधारून पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. पूर्वीप्रमाणे आता गटतट राहिले नाहीत. चांगल्या विचाराचे लोक काँग्रेसमध्ये आले की यश मिळते, असा दावाही त्यांनी केला.

संधी असेल त्या ठिकाणी मानेंच्या पाठीशी उभे राहू : सुशीलकुमार शिंदे

माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनीही अप्रत्यक्ष दिलीप माने यांना पाठिंबा दर्शविला. ते म्हणाले, दिलीप माने यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे राहूयात. दिलीप मानेंना भविष्यात कुठेही संधी असेल, त्यावेळी आम्ही त्यांच्यासोबत कायम उभे राहू. निवडणुकीत हायकमांड ठरवतील, त्या उमेदवाराच्या मागे आपण उभे राहूयात.

दिलीप माने यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे राहूयात. राजकीय क्षेत्रात माणूस पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो. आपण एकत्र राहुयात आणि काँग्रेसची संघटना मजबूत निर्माण करुयात. देशात भाजपजे जे काही चालले आहे, त्याबाबत मी बोललो होतो. मी बोललो त्याप्रमाणेच देशात झाले आहे, असा दावाही शिंदे यांनी केला.

Sushilkumar Shinde-Dilip Mane-Praniti Shinde
Karmala Politics : मोहिते पाटील देणार संजय शिंदेंना धक्का; जयवंतराव जगताप-नारायण पाटील एकत्र येणार

सिद्धाराम म्हेत्रे यांनी दिलीप माने आणि मी कॉलेजमध्ये एकत्र होतो, एवढंच सांगितले. पण, त्यांनी काय खोड्या केल्या, हे म्हेत्रे यांनी सांगितले नाही. माणसं चुकतात, पण त्या चुका दुरुस्त करणे महत्वाचे आहे, अशा शब्दांत सुशीलकुमार शिंदे यांनी माने यांच्या काँग्रेस सोडण्याबाबत अप्रत्यक्ष भाष्य केले.

Edited By : Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com