Operation Lotus : ऑपरेशन लोटस अखेर यशस्वी; सोलापुरातील दोन माजी आमदारांसह रणजितसिंह शिंदेंचा बुधवारी मुंबईत होणार भाजप प्रवेश

Solapur Political News : सोलापूर जिल्ह्यातील दोन माजी आमदार आणि एका माजी आमदार पुत्राचा भाजप प्रवेश २९ ऑक्टोबर रोजी मुंबईत होणार आहे. फडणवीस यांच्या फलटण दौऱ्यातच हा निर्णय पक्का झाला.
Ranjit Shinde-Dilip Mane-Yashwant Mane-Rajan Patil
Ranjit Shinde-Dilip Mane-Yashwant Mane-Rajan PatilSarkarnama
Published on
Updated on
  1. सोलापूर जिल्ह्यातील दोन माजी आमदार — राजन पाटील, यशवंत माने — आणि माजी आमदार पुत्र रणजित शिंदे हे २९ ऑक्टोबरला मुंबईत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

  2. काही भाजप कार्यकर्त्यांनी या प्रवेशाला विरोध दर्शवला असला तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तक्षेपानंतर प्रवेशाची तारीख निश्चित करण्यात आली.

  3. जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपरिषद निवडणुकांपूर्वी भाजपने आपली संघटनात्मक ताकद वाढविण्याचे संकेत दिले आहेत.

Solapur, 26 October : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेला सोलापूर जिल्ह्यातील दोन माजी आमदारांसह एका माजी आमदार पुत्राचा येत्या बुधवारी (ता. २९ ऑक्टोबर) मुंबईत भारतीय जनता पक्षात प्रवेश होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फलटण दौऱ्यात माजी आमदार राजन पाटील यांनी हजेरी लावली होती. त्या दौऱ्यातच सोलापुरातील तीन बड्या नेत्यांची भाजप प्रवेशाची तारीख आणि वार ठरला आहे.

सहकार परिषदेचे अध्यक्ष तथा माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार यशवंत माने, जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजित शिंदे या तिघांचा बुधवारी (ता. २९) मुंबईत भाजपच्या प्रदेश कार्यालयात प्रवेश होणार आहे.

माजी आमदार राजन पाटील, दिलीप माने, यशवंत माने आणि बबनराव शिंदे यांचे सुपुत्र रणजित आणि विक्रम शिंदे यांनी गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत वर्षा निवासस्थानी भेट घेतली होती. त्यानंतर माजी आमदार माने यांच्या प्रवेशाला सोलापूर दक्षिण मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांनी विरोध दर्शविला होता.

भाजपच्या कार्यकर्त्यांनी सोलापूर शहरातील पक्ष कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले होते. त्याबाबतचे अहवालही जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्षांनी प्रदेश भाजपला पाठविला होता, त्यामुळे हे भाजप प्रवेश लांबणीवर पडणार की काय अशी चर्चा सुरू झाली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजचा मंगळवेढ्यातील नियोजित दौराही रद्द केला होता, त्यामुळे पक्षप्रवेशाबाबत तर्कवितर्क लढविले जात होते. दिलीप मानेंचा प्रवेश पुढच्या टप्प्यात होणार असल्याचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी सांगितले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन माजी आमदारांच्या भाजप प्रवेशाला राष्ट्रवादी काँग्रेसकडून हरकत घेण्यात आल्याची माहिती मिळत होती. मात्र, मित्रपक्षाच्या विरोधाचे ज्यु झुगारून देत भारतीय जनता पक्षाकडून सोलापूर तीन महत्वाच्या नेत्यांचा पक्षप्रवेश निश्चित केला आहे. त्यानुसार येत्या बुधवारी (ता. २९ मार्च) मुंबईत या दोन माजी आमदारांसह एका माजी आमदार पुत्राचा प्रवेश भाजपमध्ये होणार आहे.

Ranjit Shinde-Dilip Mane-Yashwant Mane-Rajan Patil
Mohite Patil Vs Satpute : गावठी चाणक्य म्हणत सातपुतेंचा जयसिंह मोहिते पाटलांवर हल्लाबोल; म्हणाले, ‘इथली जनता दुधखुळी नाही...’

मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटण्यासाठी माजी आमदार राजन पाटील आणि रणजितसिंह शिंदे यांनी फलटणला गेले होते. त्या कार्यक्रमात राजन पाटील यांना व्यासपीठावर पहिल्या रांगेत स्थान देण्यात आले होते. फलटणमध्येच मुख्यमंत्री फडणवीस, पालकमंत्री गोरे, माजी आमदार पाटील, दूध संघाचे अध्यक्ष शिंदे, बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्यात बैठक झाली. त्या बैठकीत प्रवेशाची तारीख ठरविण्यात आली.

पालकमंत्री गोरे यांनी फोन करुन वैयक्तिक या चारही नेत्यांना बुधवारची तारीख सांगितली आहे. प्रवेशाची तारीख ठरल्यानंतर माजी आमदार पाटील यांच्यासह इतर नेत्यांच्या समर्थकांनी सोशल मिडियावर प्रवेशाची तारीख आणि मुंबईचा उल्लेख असलेल्या पोस्ट व्हायरल केल्या आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समित्या, नगरपरिषदांच्या निवडणुकीपूर्वी भाजपने जिल्ह्यात स्व-बळ वाढविण्यास सुरुवात केली आहे.

Ranjit Shinde-Dilip Mane-Yashwant Mane-Rajan Patil
Ram Satpute : विधानसभा मतदानाच्या दोन दिवस आधी फडणवीसांनी रणजितसिंह मोहिते पाटलांना फोन केला होता; राम सातपुतेंनी सांगितली इनसाईड स्टोरी

स्वाभिमान जपण्यासाठी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय

आमच्यासाठी सत्तेपेक्षा स्वाभिमान महत्वाचा आहे. स्वाभिमान जपण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे. आम्ही जिथे जाऊ तिथे निष्ठेने राहू. फलटणमध्ये आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आमची बैठक झाली. त्या बैठकीनंतर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आम्हाला फोनवरून बुधवारी (ता. २९ ऑक्टोबर) मुंबईत भाजप प्रवेश होणार आहे, असे मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांनी सांगितले.

1. कोणते नेते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत?
माजी आमदार राजन पाटील, यशवंत माने आणि माजी आमदार पुत्र रणजित शिंदे.

2. प्रवेशाचा कार्यक्रम कुठे होणार आहे?
मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात २९ ऑक्टोबर रोजी.

3. भाजप कार्यकर्त्यांनी काही विरोध केला होता का?
होय, सोलापूरमधील काही कार्यकर्त्यांनी माजी आमदार माने यांच्या प्रवेशाला विरोध केला होता.

4. या प्रवेशामागे पक्षाचा उद्देश काय आहे?
जिल्ह्यातील आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांपूर्वी भाजपची ताकद वाढविणे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com