Gopichand Padalkar : पडळकरांच्या निशाण्यावर पुन्हा जयंत पाटील; ‘राजारामबापू साखर कारखान्याचं धुराडं पेटू देणार नाही; इथं संघर्ष अटळ...’

Rajarambapu Patil sugar factory : जत साखर कारखाना सभासदांच्या मालकीचा व्हावा म्हणून आमदार गोपीचंद पडळकर आक्रमक झाले असून, ‘कारखाना परत दिला नाही, तर धुराडं पेटू देणार नाही,’ असा इशारा त्यांनी दिला.
jayant Patil-gopichand padalkar
jayant Patil-gopichand padalkarSarkarnama
Published on
Updated on
  1. जत साखर कारखान्यावरून वाद पेटला: भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जतच्या राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचा ताबा सभासदांना परत देण्याची मागणी केली आहे.

  2. संघर्षाचा इशारा: कारखाना सभासदांच्या मालकीचा न झाल्यास धुराडे पेटू देणार नाही आणि मोठा संघर्ष करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

  3. राजकीय दबाव वाढतोय: पडळकरांनी जयंत पाटील व इतर स्थानिक नेत्यांना आव्हान देत जतच्या जनतेला कारखान्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.

Sangli, 20 October : तुम्ही सगळेजण जतच्या प्रश्नावर एकत्र येत आहात. तर जतच साखर कारखाना सभासदांना देऊन टाका ना. तुम्हाला जतची इतकी चिंता आणि काळजी आहे तर मग तो कारखाना सभादांना पुन्हा देऊन टाका. नाही तर मी जत तालुक्यातील राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना युनीट क्रमांक चारचे धुराडे पेटू देणार नाही, मोठा संघर्ष करायची माझी तयारी आहे, असा इशारा भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे.

जत तालुक्यातील साखर कारखान्यावरून गोपीचंद पडळकर आणि जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यात पुन्हा वाद उभा राहण्याची शक्यता आहे. कारण पडळकरांनी जतमधील साखर कारखाना सभासदांच्या मालकीचा होण्यासाठी संघर्षाची भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे, त्यांनी तशी भूमिका जाहीर केली आहे.

कारखान्यासाठी आंदोलनाची काही गरज नाही. मी एकटा त्या ठिकाणी गेलो तर बस झालं, असंही विधान आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padlakar ) यांनी केले. ते म्हणाले, जत तालुक्यातील पुढारी ज्या आघाड्या करत आहेत. त्या सर्वांना माझा प्रश्न आहे की, तसेच तालुक्यातील लोकांना माझं आवाहन आहे. तुम्ही सर्वजण एकत्र या आणि हा जो ढापलेला साखर कारखाना आहे. तो आपल्याला परत घ्यायचा आहे. कारण याचं भाडंसुद्धा यापेक्षा जास्त येतंय.

जतचा कारखाना केवळ ४० कोटी रुपयांमध्ये एवढी वर्षे दिलेला आहे. तो कारखाना आम्हाला परत मिळालाच पाहिजे. कॅनॉलचे पैसेच करोडोमध्ये कारखान्याला मिळालेले आहेत. कारखान्याची जमीन २८० एकरांपर्यंत आहे. त्यामुळ जतच्या कारखान्यासाठी आमची संघर्ष करण्याची तयारी आहे. जतमधील राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचं धुराडं आम्ही पेटू देणार नाही, असा इशारा पडळकर यांनी दिला आहे.

jayant Patil-gopichand padalkar
Dattatray Bharane Solapur Tour : राष्ट्रवादीच्या ‘डॅमेज कंट्रोल’साठी अजितदादांचे विश्वासू दत्तामामा सोलापूर दौऱ्यावर; नाराजांची समजूत काढणार?

पडळकर म्हणाले, ज्या लोकांनी जतमधील राजारामबापू सहकारी साखर कारखान्याशी करार केले आहेत, त्यांना मी अगोदरच विनंती करतो की, तुमचं नुकसान व्हायला नको. इथं संघर्ष अटळ आहे. जोपर्यंत हा कारखाना जत तालुक्यातील मायबाप सभासदांच्या हक्काचा, मालकीचा होत नाही. ज्यांनी पै पै जमा करून सभासद फी भरली आहे. अनेकांनी पाच पाच ते दहा दहा सभासदत्व घेतले आहे. त्यांचा कारखाना झाला पाहिजे.

जत तालुक्यात आता माझ्या विरोधात सर्वजण आघाडी करत आहेत, त्यांनी या सर्वांचं उत्तर द्यावं आणि मग आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला समोरे जावं, असं आवाहनही गोपीचंद पडळकर यांनी केले.

jayant Patil-gopichand padalkar
Ashok Chavan News : अशोक चव्हाण, म्हणतात, 'मी अजून पंधरा-वीस वर्ष राजकारणात, एवढ्यात रिटायर्ड होणार नाही'!

Q1. गोपीचंद पडळकरांचा जत साखर कारखान्याबाबत काय आरोप आहे?
A1. त्यांनी कारखाना सभासदांकडून अन्यायाने काढून घेतल्याचा आरोप केला आहे.

Q2. पडळकरांनी कोणता इशारा दिला आहे?
A2. कारखाना सभासदांना न दिल्यास धुराडे पेटू देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.

Q3. साखर कारखाना किती रकमेत दिला गेला आहे?
A3. फक्त ४० कोटी रुपयांत कारखाना अनेक वर्षांसाठी दिला गेल्याचा आरोप आहे.

Q4. पुढील राजकीय परिणाम काय होऊ शकतात?
A4. जत तालुक्यात भाजप आणि जयंत पाटील गटांमध्ये नव्या संघर्षाची शक्यता वाढली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com