Ramdas Athawale : आठवले सत्तेतून बाहेर पडणार ? 'या' बड्या नेत्याचा गौप्यस्फोट

Lok Sabha Election 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटन आणि बळकटीकरणाची चाचपणी करण्यासाठी डॉ. राजेंद्र गवई राज्यभर दौरा करत आहेत.
Ramdas Athawale
Ramdas AthawaleSarkarnama

Kolhapur Political News :

भारतीय रिपब्लिकन पक्षाचे विविध गट एकत्र करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी 'वंचित'चे अॅड. प्रकाश आंबेडकर, रामदास आठवले आणि जोगेंद्र कवाडे यांना अध्यक्षपदही देण्यासाठी आम्ही तयार आहोत. 'रिपब्लिकन'चे ऐक्य टिकावे, यासाठी रामदास आठवले (Ramdas Athawale) सत्तेतून बाहेर पडण्यासही तयार असल्याचे त्यांनी मला सांगितले असल्याचा गौप्यस्फोट आरपीआयचे नेते डॉ. राजेंद्र गवई (Dr Rajendra Gavai) यांनी केला. आज झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. (Marathi News)

आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर पक्ष संघटन आणि बळकटीकरणाची चाचपणी करण्यासाठी भारतीय रिपब्लिकन पक्षाचे नेते आणि राज्य सरचिटणीस डॉ. राजेंद्र गवई गेल्या तीन महिन्यांपासून राज्यव्यापी दौरा करीत आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ramdas Athawale
Ramdas Athawale : 'रिपाई'तील गटबाजी उफाळली; जिल्हाध्यक्ष नियुक्तीचा वाद, रामदास आठवले घेणार 'अ‍ॅक्शन'

ते म्हणाले, "रिपब्लिकन पक्षाच्या सर्व गटांचे ऐक्य व्हावे, यासाठी आपण आधीपासूनच प्रयत्न करीत आहोत. मात्र, त्यामध्ये प्रत्येक गटाच्या नेत्यांच्या अशा-अपेक्षा आडव्या येत आहेत. त्यावर उपाय म्हणून आपण आरपीआयचे अध्यक्षपद प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar), रामदास आठवले, जोगेंद्र कवाडे यांना देण्यास तयार आहोत. या प्रस्तावाला रामदास आठवले यांनी तत्त्वतः मान्यता दर्शविली असून, प्रसंगी आरपीआयच्या ऐक्यासाठी सत्तेतून बाहेर पडण्याचीही तयारी दर्शवली आहे, असंही ते म्हणाले.

अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल गवई म्हणाले, 'त्यांना महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) जागावाटपावरून झुलवत आहे. त्यांना सहा जागा देण्याचे महाविकास आघाडीने ठरवले आहे. यातही आंबेडकर समाधानी नसतील, तर त्यांनी आपल्या गटाबरोबर युती करावी. गवई गट शिर्डी, सातारा (Satara), अमरावती लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. सर्वच ठिकाणी गवई गटाचे उमेदवार उभे केले जातील, असेही गवई यांनी स्पष्ट केले. या वेळी पत्रकार परिषदेला पांडुरंग कांबळे, पंडित ठोमके, निवास सडोलीकर, भीमराव कांबळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

(Edited By-Ganesh Thombare)

R

Ramdas Athawale
Loksabha Election 2024 : काँग्रेसला संधी अन् राष्ट्रवादीची गुगली; महाविकास आघाडीत सांगलीच्या जागेचा तिढा वाढला ?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com