Rajendra Phalke : झेडपीत स्वबळावर सत्ता मिळवू

राष्‍ट्रवादी काँग्रेसचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके ( Rajendra Phalke ) यांनी राष्ट्रवादी भवन येथे पत्रकार परिषदेत घेतली.
Rajendra Phalke, NCP
Rajendra Phalke, NCPSarkarnama
Published on
Updated on

NCP : शिर्डी ( ता. राहाता ) येथे ४ व ५ नोव्हेंबरला हे शिबिर होणार आहे. या शिबिराची माहिती देण्यासाठी राष्‍ट्रवादी काँग्रेसचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके ( Rajendra Phalke ) यांनी राष्ट्रवादी भवन येथे पत्रकार परिषदेत घेतली.

राजेंद्र फाळके म्हणाले, अहमदनगर जिल्ह्यात विधानसभा निवडणुकांत १२-०च्या वल्गना करणाऱ्यांचे काय होते हे सर्वांना कळाले आहे. मागील विधानसभा निवडणुकांत राष्ट्रवादी काँग्रेसने सहा जागा जिंकल्या होत्या. आता आणखी जागा वाढविण्याचा प्रयत्न आहे. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आमची तयारी आहे. तिथे आमची सत्ता होती. आताही आम्‍ही स्वबळावर सत्ता मिळवू, असे त्यांनी सांगितले.

Rajendra Phalke, NCP
राजेंद्र फाळके म्हणाले, प्रताप ढाकणे षटकार मारणार...

ते पुढे म्हणाले की, शिवसेनेने हिंदूत्व सोडलेले नाही आणि आम्ही शाहू-फुले-आंबेडकरी विचार सोडलेला नाही. काळाची गरज म्हणून शिवसेना, काँगेस, राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले आहेत. त्यामुळे हे समविचारी पक्ष आहेत. शिर्डीतील शिबिरात समविचारी पक्षाचेही काही नेते दिसतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

Rajendra Phalke, NCP
केंद्राकडून केवळ आश्वासनांचा पाऊस, प्रत्यक्षात योजनांचा दुष्काळच : फाळके

अहमदनगर जिल्ह्याची ठिकाण असूनही शिर्डी येथे भाजप, काँग्रेस व त्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचेही शिबिर होत आहे. या संदर्भात विचारले असता फाळके यांनी सांगितले की, शिर्डी येथे राहणे, विमान आदी सेवा सहज मिळतात. त्यामुळे जिल्ह्यात मोठे शिबिर घ्यायचे असल्यास आम्ही शिर्डीलाच प्राधान्य देतो, असे त्यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com