Solapur Dcc Bank : सोलापूर जिल्हा बॅंकेसाठी भाजपची स्ट्रॅटेजी ठरली; राऊत-कल्याणशेट्टींनी घेतली बैठक, माजी संचालकांचा ‘तो’ प्रश्न फडणवीस दरबारी सुटणार

BJP Leader Meeting : सोलापूर जिल्हा बँक निवडणुकीसाठी 2165 ठराव दाखल झाले. राजेंद्र राऊत आणि सचिन कल्याणशेट्टी यांनी भाजप मित्रपक्षांची बैठक घेतली. निवडणूक रणनीती ठरली असून जयकुमार गोरे यांच्या बैठकीत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
BJP Leader Meeting
BJP Leader Meeting Sakarnama
Published on
Updated on

Solapur, 13 September : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी एकूण २१६५ ठराव दाखल झाले आहेत. या ठरावानुसार विभागीय सहनिबंधकाकडून प्रारुप यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सूचनेनुसार आमदार राजेंद्र राऊत आणि सचिन कल्याणशेट्टी यांनी भाजप व मित्रपक्षांच्या प्रमुख नेतेमंडळींची सोलापुरात बैठक घेतली. त्या बैठकीत भारतीय जनता पक्षाची जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीबाबतची स्टॅट्रेजी ठरली असून पालकमंत्र्यांच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, सहकार कायदा कलम ८८ अन्वये ज्या माजी संचालकांवर डीसीसी बॅंकेच्या नुकसानीची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे, त्यांच्याबाबत तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दरबारात जाण्याचा निर्णय झाल्याचे समजते, त्यामुळे सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेवर भाजपची सत्ता येणार हे निश्चित मानले जात आहे.

बॅंक ताब्यात घेण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून जोरदार प्रयत्न सुरू असून ठरावांमध्ये त्याचे प्रतिबिंब दिसून येत आहेत. आता हे ठराव सहनिबंधकांकडे प्रारुप मतदारयादीसाठी पाठविण्यात येणार असून आक्षेप आणि हरकतीनंतर त्यांच्याकडून प्रारूप मतदारयादी जाहीर होणार आहे.

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीत सोसायटी मतदारसंघातील ११ जागांवर त्या त्या तालुक्यांतील नेत्यांना संधी दिली जाणार आहे. महिलांच्या दोन, एससी/एसटीची एक, ओबीसीची एक, भटक्या जाती/जमातीची एक, कृषी प्रक्रिया-पणन प्रक्रियाची एक, दुग्ध सहकारी संस्थेची एक आणि नागरी बॅंका-पतसंस्था मतदारसंघातील एक अशा आठ जागांचा निर्णय उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या आदल्या दिवशी घेण्याचा निर्णय जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांनी घेतला आहे.

BJP Leader Meeting
Solapur Dcc Bank : सोलापूर जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी 2165 ठराव; परिचारकांच्या पंढरपुरात सहकाराचे सर्वाधिक 181 ठराव

जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी सोलापुरातील शासकीय विश्रामगृहात प्रमुख नेत्यांची बैठक झाली. यामध्ये भारतीय जनता पक्षाचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार राजेंद्र राऊत, आमदार बाबासाहेब देशमुख, माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार संजयमामा शिंदे, माजी आमदार दिलीप माने, माजी आमदार जयवंतराव जगताप, माजी संचालक बबनराव आवताडे, माजी संचालक सुरेश हसापुरे, उमेश परिचारक उपस्थित होते.

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सूचनेवरून आमदार कल्याणशेट्टी आणि आमदार राऊत यांनी ही बैठक बोलविली होती. येत्या तीन ते चार दिवसांत डीसीसीच्या बाबतीत पालकमंत्री गोरे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्याचा निर्णयही सोलापुरातील बैठकीत घेण्यात आला.

BJP Leader Meeting
Pandharpur Corridor : पंढरपूर नगरपालिकेने कॉरिडॉरला स्थगिती देताच मुख्यमंत्र्यांनी उचलले मोठे पाऊल

सहकार कायदा कलम ८८ अन्वये माजी संचालकांवर डीसीसी बँकेच्या नुकसानीची जबाबदारी निश्‍चित करण्यात आली आहे, त्यामुळे माजी संचालकांना निवडणूक लढविता येण्यास अडथळे येत आहेत, ज्यांनी बँकेचे नूकसान केले, त्या कोणाचीही पाठराखण करू नये, पण ज्यांच्यामुळे नुकसान झाले नाही, त्यांच्यावर अन्याय होऊ नये, यामध्ये तोडगा काढण्यासाठी वेळप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतही बैठक घेण्याचे यावेळी ठरविण्यात आल्याची माहिती आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com