Vidhan Parishad Election : राजेंद्र राऊतांचे पारडे जड : पवारांच्या राष्ट्रवादीचे 3, शेकापच्या एका आमदारासह काँग्रेसच्या माजी आमदाराचाही भाजपला पाठिंबा

Mahayuti Meeting News : सोलापूर विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या तीन, शेकापच्या एका आणि काँग्रेसच्या एका माजी आमदाराने भाजप उमेदवार राजेंद्र राऊत यांना पाठिंबा जाहीर केला.
Ravindra chavan
Ravindra chavanSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 11 June : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तीन, शेतकरी कामगार पक्षाच्या एका आमदाराने, तर काँग्रेसच्या एका माजी आमदाराने सोलापूर विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांना पाठिंबा जाहीर केला आहे. महायुतीच्या बैठकीत या सर्वांच्या वतीने माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांनी याबाबतची घोषणा केली. त्या पाठिंब्याबद्दल भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी या सर्वांचे आभार मानले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माळशिरसचे आमदार उत्तम जानकर, माढ्याचे आमदार अभिजीत पाटील आणि करमाळ्याचे आमदार नारायण पाटील, शेतकरी कामगार पक्षाचे सांगोल्याचे डॉ. बाबासाहेब देशमुख या चार आमदार, तर माढ्याचे माजी आमदार धनाजी साठे यांनी भाजपचे उमेदवार राजेंद्र राऊत यांना पाठिंबा जाहीर केला आहे, यामुळे आधीच मजबूत असलेल्या भाजप उमेदवाराची स्थिती मजबूत झाली आहे.

विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या नेत्यांची भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्या बैठकीत महाविकास आघाडीच्या चार आमदारांनी, तर एक माजी आमदाराने भाजपला पाठिंबा दिला. त्या बैठकीनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी माध्यमांशी संवाद साधला.

ते म्हणाले, विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या नेत्यांची बैठक आयोजित केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली सबका साथ सबका विकास या सूत्रानुसार महायुतीचे काम सुरू आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या कामाची पद्धत आणि राजेंद्र राऊत यांना मिळालेली उमेदवारी यामुळे सर्वपक्षीय आमदारांनी भाजप उमेदवाराला मतदान करण्याचे आश्वासन दिलं आहे.

Ravindra chavan
MLC Election : सोलापुरात विधान परिषद निवडणुकीत मोठी उलथापालथ : पवारांच्या तीन आमदारांची महायुतीच्या बैठकीला हजेरी

विधान परिषदेच्या १७ पैकी ६ जागा बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरीत अकरा जागी महायुतीच्या बाजूने वातावरण आहे. सोलापुरातील मतदारांची भावना महायुतीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांना निवडून देण्याची आहे. त्यासाठी एकत्र येणं, हे पुढील राजकारणासाठीसुद्धा अत्यंत महत्वाचं आहे, असं सूचक विधानही चव्हाण यांनी केले.

रवींद्र चव्हाण म्हणाले, भाजप उमेदवाराला पाठिंबा देणाऱ्या आणि महायुतीच्या बैठकीला उपस्थित राहणाऱ्या महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांचे मी आभार मानतो. आमदारांनी पाठिंबा देण्याच्या भूमिकेकडे राजकारण न पाहता सोलापूर जिल्ह्याने एक नवीन पायंडा पाडला आहे. जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींच्या सर्व समस्या मांडण्यासाठी विधान परिषदेत प्रतिनिधी असावा, यासाठी विधान परिषदेची रचना केलेली आहे.

Ravindra chavan
Gore On Ranjitsinh Mohite Patil : जयकुमार गोरेंचे रणजितसिंह मोहिते पाटलांबाबत मोठं विधान : ‘मी काय त्यांचा शोध घेत नाही...’

एक चांगला पायंडा पाडल्यामुळे राजेंद्र राऊत हे सर्व प्रश्नांची जाण ठेवून विरोधकांचे आणि सत्ताधाऱ्यांचे विषय यांचा समन्वय घडवून सोलापूरला न्यायाच्या दिशेने घेऊन जाण्याची त्यांची प्रमुख भूमिका असेल, असे वाटते सर्वच विषय माध्यमांसमोर बोलणे उचित नाही. पण जयकुमार गोरेंशी तुम्ही बोला म्हणजे तुम्हाला सर्व गोष्टींचा उलगडला होऊ शकतो, असेही नमूद केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com