

बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 पैकी 18 जागांवर माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या बळीराजा विकास पॅनेलने दणदणीत विजय मिळवला.
हा निकाल नगरपरिषद निकालाअगोदरच आमदार दिलीप सोपल यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात असून दोन्ही गटांमध्ये चुरस होती.
मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच राऊत पॅनेल आघाडीवर राहिले आणि सलग दुसऱ्यांदा बाजार समितीवर झेंडा फडकवण्यात यशस्वी झाले.
Barshi, 08 December : नगरपरिषद निवडणूक निकालाच्या अगोदरच बार्शीत माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी गुलाल उधळला आहे. बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 पैकी 18 जागांवर बाजी मारत माजी आमदार राऊत यांनी दुसऱ्यांदा बाजार समितीवर झेंडा फडकवला आहे. दरम्यान, नगरपरिषद निवडणुकीच्या निकालाअगोदर बाजार समितीमधील पराभव हा आमदार दिलीप सोपल यांच्यासाठी धक्कादायक मानला जात आहे.
बार्शी बाजार समितीच्या (Barshi Bazar Samiti) निवडणुकीसाठी पारंपारिक प्रतिस्पर्धी आमदार दिलीप सोपल आणि माजी आमदार राजेंद्र राऊत हे आमने सामने आले होते. दोन्ही गटांकडून मोठ्या अटीतटीने निवडणुका लढवल्या होत्या. या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे बाजार समितीच्या निवडणुकीत प्रथमच आमदार सोपल आणि माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या घरातील कोणीही उमेदवार नव्हता.
सोपल आणि राऊत यांनी कार्यकर्त्यांसाठी जोर लावला होता. मतदानापूर्वीच माजी आमदार राजेंद्र राऊत (Rajendra Raut) यांच्या बळीराजा विकास पॅनेलचे व्यापारी मतदारसंघातील दोन उमेदवार बिनविरोध निवडले गेले होते. त्यामुळे रविवारी (ता. 07 डिसेंबर) 16 जागांसाठी चुरशीने 96.98 टक्के मतदान झाले होते.
बार्शी बाजार समितीच्या मतमोजणीला आज (ता. 08 डिसेंबर) सकाळी आठपासून सुरुवात झाली होती. पहिल्या फेरीपासूनच माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या पॅनेलने मतमोजणीत आघाडी घेतली होती. ती शेवटपर्यंत कायम होती. मात्र, विजयातील अंतर कमी असल्यामुळे दोन्ही पॅनेलमध्ये चुरस दिसून आली.
माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या बळिराजा विकास आघाडीचे विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे :
सहकारी संस्था : सुरेश गुंड (815), बाबा गायकवाड (790), विजय गरड (804), अभिजित कापसे (798), प्रभाकर डंबरे (818), रविकांत साळुंखे (791), यशवंत माने (813).
महिला राखीव : मनीषा ताकभाते (850), सुमन पाटील (844). इतर मागासवर्गीय प्रवर्ग : संजयकुमार माळी (852). विमुक्त जाती भटक्या जमाती : रामेश्वर पाटील (829)
ग्रामपंचायत मतदार संघ : नेताजी घायतिडक (632), अजित बारंगुळे (626) अनुसूचित जाती जमाती : सतीश हनुमंते (620). आर्थिक दुर्बल घटक : सचिन बुरगुटे (621). हमाल तोलार मतदारसंघ : गजेंद्र मुकटे (727)
माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या गटाच्या दोन जागा व्यापारी मतदारसंघातून यापूर्वीच बिनविरोध झालेल्या आहेत, त्यामुळे राऊत यांनी सलग दुसऱ्यांदा बाजार समितीवर झेंडा फडकावला आहे.
1. बार्शी बाजार समितीत कोणाचा विजय झाला?
माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या बळीराजा विकास पॅनेलने सर्व 18 जागा जिंकल्या.
2. हा निकाल कोणासाठी धक्का मानला जातो?
आमदार दिलीप सोपल यांच्यासाठी हा निकाल धक्कादायक ठरला.
3. मतमोजणीमध्ये आघाडी कशी होती?
पहिल्या फेरीपासून राऊत पॅनेल कायम आघाडीवर होते.
4. किती टक्के मतदान झाले होते?
एकूण 96.98% मतदानाची नोंद झाली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.