Gopichand Padalkar : विरोधी पक्षनेतेपद कधी नेमणार?; फडणवीसांच्या निकटवर्तीय आमदाराने वर्षंच सांगून टाकलं....

Leader of Opposition Assembly : नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेतेपदाच्या मुद्द्यावर राज्यात मोठे राजकीय वादंग निर्माण झाले असून सरकारची भूमिका, शिवसेना युबीटीची मागणी आणि भाजप नेत्यांची प्रतिक्रिया लक्षवेधी ठरत आहे.
Gopichand Padalkar
Gopichand PadalkarSarkarnama
Published on
Updated on
  1. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेतेपदाच्या नियुक्तीवरून राजकीय वाद चिघळला असून सरकारने अजूनही नेमणूक केलेली नाही.

  2. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने भास्कर जाधव यांचे नाव सुचविले असले तरी संख्याबळ अपुरे असल्यामुळे नियुक्ती प्रलंबित आहे.

  3. आमदार गोपीचंद पडळकर यांनी विरोधकांना 2029 ची तयारी करण्याचा सल्ला देत जनतेने पुरेसे आमदार न दिल्याने विरोधी पक्षनेतेपद शक्य नसल्याचा ठाम दावा केला.

Nagpur, 08 December : विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशानाला आजपासून (ता. 08 डिसेंबर) नागपुरात सुरुवात झाली आहे. तत्पूर्वी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येपासूनच राज्यात विरोधी पक्षनेतेपदावरून जोरदार राजकीय रणकंदन माजले आहे. विरोधी पक्षनेते नेमणार नसाल तर उपमुख्यमंत्रिपद रद्द करण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते कधी नेमणार याची उत्सुकता असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे लाडके आमदार गोपीचंद पडळकर यांनी विरोधकांना थेट 2029ची तयारी करण्याचे आवाहन केले आहे, त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद नेमण्याबाबत सरकारची भूमिका स्पष्ट होत आहे.

विधानसभेतील सर्वाधिक आमदार असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांचे नाव विरोधी पक्षनेतेपदासाठी सूचविण्यात आलेले आहे. मात्र, सरकार सत्तेवर येऊन एक वर्षे झाले, यादरम्यानच्या काळात दोन अधिवेशने झाली. आताचं हिवाळी अधिवेशन हे तिसरं अधिवेशन आहे. मात्र, विरोधी पक्षनेतेपदाची नियुक्ती होत नसल्याने विरोधी पक्षांकडून सरकारी पक्षांवर टिकास्त्र सोडले जात आहे.

आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) म्हणाले, आपण लोकशाही मानणाऱ्या देशात आणि राज्यात राहतो. संविधानाने काही अटी घालून दिलेल्या आहेत. विरोधी पक्षनेते होण्यासाठी तुमचे आमदार किती निवडून आले पाहिजेत, हे कायद्याने सांगितलेले आहे. यामध्ये काय वेगळे आहे. लोकांनी तुम्हाला नाकारले आहे. राज्यातील जनतेने तुम्हाराला सरकार बनविण्यासाठी बहुमत तर दिलेच नाही. पण, विरोधी पक्षनेते तुम्ही व्हावं, असं संख्याबळ तुम्हाला जनतेने दिलेले नाही.

भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचे सरकार हे जनतेच्या मताचं आदर करतं. जनतेनेच जर तुम्हाला विरोधी पक्षनेते होण्याएवढे आमदार निवडून दिले नसतील, तर महायुती सरकार जनतेने दिलेल्या कौलाचा अपमान करू शकत नाही. विरोधी पक्षातील लोक काहीही बोलत असतात, असा टोलाही पडळकरांनी लगावला.

Gopichand Padalkar
Vidhan Bhavan drama: विधानभवनाबाहेर ‘हाय व्होल्टेज ड्रामा’! निवडणुकीत भाजपवर तुटून पडणारे निलेश राणेंसमोर रवींद्र चव्हाण आले अन्...

ते म्हणाले, तुम्ही आता 2029च्या विधानसभा निवडणुकीची वाट पाहा, लोकांच्या मध्ये जावा. आगामी 2029 च्या निवडणुकीत किमान विरोधी पक्षनेतेपद मिळावे, एवढे आमदार तरी निवडून यावेत, यासाठी तुम्ही प्रयत्न करा.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एवढं कळायला पाहिजे ना? तुम्ही मुख्यमंत्रिपदावर अडीच वर्षे काम केले आहे. विरोधी पक्षनेतेपद मिळायला हवे, एवढं जरी लोकांनी तुम्हाला मतदान केले नसेल आपण काय करायचं, याचा विचार त्यांनी करायला हवा होता, असा टोला गोपीचंद पडळकरांनी ठाकरेंना लगावला.

Gopichand Padalkar
Vande Mataram in Parliament : ‘वंदे मातरम्’वर अन्याय झाला, विश्वासघात झाला! PM मोदींकडून महात्मा गांधी, नेहरूंचे नाव घेत हल्लाबोल

1. विरोधी पक्षनेतेपदाचा वाद का चिघळला आहे?
सरकारने अद्याप विरोधी पक्षनेते नियुक्त न केल्याने विरोधक नाराज आहेत.

2. कोणाचे नाव विरोधी पक्षनेतेपदासाठी सुचवले आहे?
भास्कर जाधव यांचे नाव शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून सुचवण्यात आले आहे.

3. सरकार नियुक्ती का करत नाही?
विरोधी पक्षाकडे कायद्यानुसार आवश्यक संख्याबळ नसल्याचा सरकारचा दावा आहे.

4. गोपीचंद पडळकरांनी विरोधकांना काय संदेश दिला?
2029 च्या निवडणुकीत आवश्यक संख्याबळ मिळवण्यासाठी प्रयत्न करा, असा सल्ला त्यांनी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com