Raju Shetti : ‘एनडीआरएफ’च्या मदतीच्या प्रस्तावाबाबत राजू शेट्टींचा मोठा दावा; ‘केंद्राकडून महाराष्ट्र सरकारवर दबाव...’

NDRF Assistance Proposal : राजू शेट्टी यांनी अतिवृष्टी मदत प्रस्तावावर केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधाभासी विधानांवर प्रश्न उपस्थित करत दोन्ही सरकारांची जबाबदारी आणि पारदर्शकता याबाबत गंभीर शंका व्यक्त केली आहे.
Raju Shetti
Raju ShettiSarkarnama
Published on
Updated on
  1. अतिवृष्टीग्रस्तांना मदत मिळावी म्हणून राज्याने प्रस्ताव पाठवल्याचा दावा करत असताना केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान म्हणतात की प्रस्ताव आलेलाच नाही, त्यामुळे केंद्र–राज्य सरकारांमध्ये वाद निर्माण झाला आहे.

  2. या परस्परविरोधी दाव्यांवर राजू शेट्टी यांनी “खोटं कोण बोलतंय—केंद्र की राज्य?” असा सरळ सवाल उपस्थित केला.

  3. शेट्टी यांनी केंद्राने निवडणुकीआधी Punjab आणि Bihar ला मोठा निधी दिल्याची टीका करत एनडीआरएफ निधी संपल्याची शक्यता व्यक्त केली आणि या प्रकरणात सत्य स्पष्ट करण्याची मागणी केली.

Solapur, 05 December : राज्यातील अतिवृष्टीग्रस्तांना मदत मिळावी, यासाठी राज्यातील महायुती सरकारने केंद्र सरकारकडे अतिरिक्त मदतीचा प्रस्ताव पाठविण्यात आलेले नाही, असे केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान लोकसभेत प्रश्नोत्तरांच्या सभेत दिले होते. राज्य सरकारकडून मात्र मदतीचा प्रस्ताव पाठविल्याचे स्पष्ट केले आहे. त्यावरून माजी खासदार राजू शेट्टी यांनी खोटं कोण बोलतंय...केंद्र की राज्य सरकार? असा सवाल शेट्टी यांनी केला आहे.

राज्यातील अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्य सरकारने अतिरिक्त निधीची मागणीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवावा, अशी सूचना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली होती. त्याबाबत संसदेच्या हिवाळी अधिवेशनात प्रश्न विचारण्यात आला होता. त्या वेळी केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान (ShivrajSinh Chauhan) यांनी अतिरिक्त मदतीसाठीचा प्रस्ताव आला नसल्याचे सांगितले होते. त्यावरून राज्यात वाद पेटला आहे.

त्या वादावर राजू शेट्टी (Raju Shetti) म्हणाले, दोन दिवसांपूर्वी शिवराजसिंह चौहान यांनी राज्याकडून मदतीसाठी प्रस्ताव आलेला नाही, हे सांगितले. त्यामुळे शिवराजसिंह चव्हाण खोटे बोलत आहेत का, असा सवाल उपस्थित होत आहे. कारण राज्य सरकार बोलतंय की प्रस्ताव पाठवला आहे.

केंद्र सरकारने निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पंजाब आणि बिहार राज्याला भरीव असा निधी दिला आहे. त्यामुळे एनडीआरएफमधील पैसा संपलेला असावा, त्यामुळे राज्य सरकारने केंद्राकडे आर्थिक मदतीची मागणी करू नये, असा दबाव केंद्रातून महाराष्ट्र सरकारवर आला असावा अथवा महाराष्ट्र सरकारच्या बेजबाबदारपणामुळे प्रस्ताव अजून गेलेला नसावा, असेही शेट्टी यांनी नमूद केले.

Raju Shetti
Maharashtra Politic's : पृथ्वीराजबाबांचं मराठी पंतप्रधानाबाबत भाष्य; तर राष्ट्रवादी नेत्याचा अजितदादांच्या मुख्यमंत्रिपदाबाबत मोठा दावा

अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी एनडीआरएफकडे आर्थिक मागणीचा प्रस्तावाबाबत कोण खोटं बोलतंय ते स्पष्ट करावे. एकमेकांकडे बोट दाखवली जात आहे. पण, केंद्र आणि राज्य सरकारने आता बाप दाखवावा; नाहीतर श्राद्ध तरी घालावे, असे आवाहन राजू शेट्टी यांनी केले आहे.

या प्रकरणात केंद्र किंवा राज्य यापैकी कोणीतरी खोटे बोलतंय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार ओमराजे निंबाळकर यावर नक्की आवाज उठवतील, असा विश्वास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी व्यक्त केला आहे.

Raju Shetti
Uttam Jankar : जयकुमार गोरेंवर उत्तम जानकरांचा गंभीर आरोप; ‘त्याची फक्त चिठ्ठी पाठवा, थेट कार्यक्रम लावतो’

1. वाद कशामुळे सुरू झाला?
→ केंद्राने ‘प्रस्ताव आला नाही’ आणि राज्याने ‘प्रस्ताव पाठवला’ असे सांगितल्याने विरोधाभास निर्माण झाला.

2. राजू शेट्टी यांचा मुख्य आरोप काय आहे?
→ केंद्र किंवा राज्य यापैकी कुणीतरी जनता दिशाभूल करत आहे, असे ते म्हणतात.

3. शेट्टी यांनी एनडीआरएफबाबत काय सूचित केले?
→ Punjab–Biharला वाटपामुळे निधी संपल्याने महाराष्ट्रावर दबाव आला असावा, अशी शक्यता त्यांनी मांडली.

4. पुढील कारवाईबाबत शेट्टी काय म्हणाले?
→ शिवसेना (उद्धव गट) खासदार ओमराजे निंबाळकर यावर आवाज उठवतील, असा त्यांना विश्वास आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com