Raju Shetti :...तरच मुरलीधर मोहोळ यांच्या बाबतचे गैरसमज दूर होतील', राजू शेट्टी जैन बोर्डिंगवरून पुन्हा भिडणार

Jain Boarding Raju Shetti Murlidhar Mohol : जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणात राजू शेट्टी यांनी जोपर्यंत जैन बोर्डिंगचे नाव लागत नाही तो पर्यंत गैरसमज दूर होणार नसल्याचे म्हटले आहे.
Raju Shetty
Raju Shetty Sarkarnama
Published on
Updated on

Raju Shetti News : पुण्यातील जैन बोर्डींग जमीन व्यवहार प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर विरोधकांसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी देखील तुटून पडले. अखेर विशाल गोखले यांनी जैन बोर्डिंग व्यवहारामधून माघार घेतली. मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचा संघर्षाचा लढा सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तर मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या बाबत गैरसमज, तेव्हाच दूर होतील जेव्हा जैन बोर्डिंगचे नाव जमिनीच्या कागदपत्राला लागतील. असे स्पष्टीकरण राजू शेट्टी यांनी दिले.

विशाल गोखले यांनी व्यवहार रद्द होणार असल्याचे पत्र ट्रस्टींना देऊन व्यवहार रद्द करत असल्याची घोषणा केली. विश्वस्तांनी घेतलेली व्यवहारातील रक्कम माघारी देण्याची विनंती केली. कर्ज दिलेल्या दोन्ही बँकांचे रजिस्ट्रार ऑफिसला पत्र देत व्यवहारातून माघार घेतली असल्याचे स्पष्ट केले. त्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरणी गोखले बिल्डरनी HND जैन बोर्डिंगचा डील रद्द करण्याचा निर्णय ट्रस्टींना पाठविला आहे. मात्र जोपर्यंत गोखले बिल्डरचे डिड रद्द होवून त्यांचे नाव कमी होवून HND जैन बोर्डिगचे नाव लागणार नाही तोपर्यंत लढा सुरूच राहणार असल्याचा इशारा शेट्टी यांनी दिला आहे.

ट्रस्टींनी गोखले बिल्डर्सकडून घेतलेले 230 कोटी रुपये परत गोखले बिल्डर्स ना परत करावे, अद्यापही जैन बोर्डिंगवर गोखले बिल्डर्स नाव आहे. ते नाव कमी होऊन एचडी जैन बोर्डिंग हे नाव पुन्हा लागत नाही तोपर्यंत लढा सुरूच राहणार. काल रात्री पुणे इथेच झालेल्या बैठकीत हा लढा तीव्र करण्याचा घेण्यात आलाय निर्णय एक तारखेला आंदोलनाला सुरुवात होणार, असल्याची माहिती राजू शेट्टी यांनी दिली.

Raju Shetty
Party Switching In Maharashtra : फुले-शाहू-आंबेडकरांचं नाव घ्यायचं, अन् धर्मांधांना पाठिंबा द्यायचा, हे काय बरोबर नाही; बाळासाहेब थोरातांची फटकेबाजी

पुढे बोलताना ते म्हणाले, मुरलीधर मोहोळ यांनी रात्री ११:३० वाजता ट्रस्टींना गोखलेंनी पत्र दिल्याची माहिती दिली. मात्र ट्रस्टी याबाबत माहिती द्यायला तयार नाहीत. मात्र आज देशभर त्याबाबत आवाज उठवला जाणार आहे. ३० तारखेपर्यंत जागेवर ट्रस्टचे नाव लागावे अन्यथा एक तारखेपासून गुप्तानंद महाराज यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू करणार आहे.

जो पर्यंत जैन बोर्डिंगचे नाव लागत नाही तोपर्यंत मुरलीधर मोहोळ यांच्या बाबतले गैरसमज दूर होणार नाहीत.रवींद्र धंगेकर यांचे मत पूर्णता बरोबर आहे. कारण या सर्व लढ्यात पुणेकरांची, विद्यार्थ्यांची साथ आहे. धंगेकर, विद्यार्थ्यांना आणि सामाजिक संघटनेंना पाठिंबा दिला आणि त्यांच्या भूमिकेला आम्ही विसरू शकत नाही. असे देखील शेट्टी म्हणाले.

Raju Shetty
Jain Boarding controversy update : मैत्री असावी तर गोखले अन् मोहोळ यांच्यासारखी..! जैन मुनींकडून कौतुक, आता अजितदादांवर नाराजी

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com