
Maharashtra Budget 2025 : राज्य सरकारकडून सोमवार (10 मार्च) अर्थमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळात राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पनावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी कडाडून टीका केली आहे.
''राज्यातील शेतकरी, शेतमजूर, कामगार व छोट्या व्यापाऱ्यांकरिता अत्यंत निराशाजनक बजेट सादर करण्यात आले आहे. आजच्या अर्थसंकल्पामध्ये कर्जमुक्ती हवेत, सिंचन कर गाळात, कृषी प्रक्रिया उद्योग रसातळात, खताच्या किंमती आभाळात, शेतकरी(Farmer) फक्त शक्तीपीठच्या भुसंपादनात, सोयाबीन, तूर, कांदा ,कापूस सडतोय शिवारात, मात्र अर्थसंकल्पात राज्यकर्ते अधिकारी दलाल मात्र राजमहालात.'' अशा शब्दात शेट्टी यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.
याशिवाय, आजचे बजेट सादर करत असताना औद्योगीक धोरणामध्ये कृषी औद्योगीक धोरणाला महत्व देणे गरजेचे होते. महायुतीने विधानसभा निवडणुकीत जाहीर केलेले जाहीरनाम्यातील किमान हमीभावावर २० टक्के अनुदान , शेतकरी कर्जमाफी, खतांवरील राज्य सरकारचा जीएसटी कमी करणे, सोयाबीनला ६ हजार हमीभाव देणे, कृषी प्रक्रिया केंद्र उभारणी, पायाभूत सोयीसुविधा, पशुसंवर्धन व दुग्ध विकास विभागाकरिता अधुनिक तंत्रज्ञान व सोयीसुविधा, यासारख्या कोणत्याच गोष्टींचा या बजेटमध्ये उल्लेख करण्यात आलेला नाही. आज सादर करण्यात आलेले बजेट हे कार्पोरेट बजेट असल्याचे टीका देखील माजी खासदार शेट्टी(Raju Shetti) यांनी केली.
एकेकाळी शेती व्यवसायात अग्रगण्य असणाऱ्या राज्यात या बजेटमधून शेती व्यवसायाला बगल दिल्याने याचे दुरगामी परिणाम शेतकरी व शेतमजूरांना भोगावे लागणार आहे. सिंचन कर आकारणी स्थगिती दिली असल्याचे जलसंपदा मंत्री सांगत होते. मात्र त्याबाबत कोणतीचे वक्तव्य वित्तमंत्री यांचेकडून करण्यात आलेले नाही. असंही राजू शेट्टी यांनी सांगितले.
तर एकीकडे बड्या उद्योगपतींच्या अनेक मोठमोठ्या प्रकल्पाकरिता करामध्ये सवलती देण्यात आल्या आहेत. शेतक-यांना मात्र वाऱ्यावर सोडण्यात आले असल्याचा आरोपी शेट्टी यांनी केला आहे.
(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.