Prakash Abitkar : हद्दवाढ नाही तर विकास नाही! उपमुख्यमंत्री अजितदादांनी आरोग्यमंत्र्यांना खडसावले, आबिटकारांनी सांगितली 'आप बीती'

Ajit Pawar Rebukes Prakash Abitkar : कोल्हापूर शहरासह कोल्हापूर महापालिकेला निधी मिळावा, यासाठी पालकमंत्री आबिटकर यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. त्यावेळी प्रशासक आणि पालकमंत्र्यांना अजितदादांनी खडसावले.
Ajit Pawar Prakash Abitkar
Ajit Pawar Prakash Abitkarsarkarnama
Published on
Updated on

Prakash Abitkar News: कोल्हापूर हद्दवाढ प्रश्नावरून ग्राचमीण आणि शहरी असा वाद निर्माण झाला आहे. सातत्याने आंदोलन, निदर्शन, सुरू असून शहराची हद्दवाढ व्हावी, यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरू आहे. हद्दवाढ राजकीय इच्छाशक्तीमुळे प्रलंबित आहे. सातत्याने या प्रश्नामुळे शहर आणि ग्रामीण लोकप्रतिनिधींमध्ये वाद निर्माण होताना दिसत आहेत. अशातच पुन्हा एकदा वादाचा मुद्दा समोर आला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापूरच्या हद्दवाढीवरून थेट आरोग्यमंत्री आणि कोल्हापुरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि कोल्हापूर महापालिकेच्या प्रशासक के मंजू लक्ष्मी यांनाच दरडावले आहे. याबाबतची माहिती खुद्द पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनीच दिली.

Ajit Pawar Prakash Abitkar
Maharashtra Budget 2025: अजितदादांचा बजेट हा कविता, आकडे अन् भावनांचा खेळ; सामान्यांच्या पदरी निराशा; रोहित पवार संतापले

कोल्हापूर शहरासह कोल्हापूर महापालिकेला निधी मिळावा, यासाठी पालकमंत्री आबिटकर यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. त्यावेळी प्रशासक आणि पालकमंत्र्यांना अजितदादांनी झापले. आधी शहराची हद्दवाढ करा. नाहीतर एक रुपयाही देणार नाही. पुण्याची 27 वेळा हद्दवाढ झाली. तुमची का होत नाही? त्यासाठी पाठपुरावा करा, अशा शब्दात अजितदादांनी दरडावले असल्याचे पालकमंत्री आबिटकर यांनी 'कोल्हापूर फर्स्ट' या कार्यक्रमात जाहीरपणे सांगितले.

चंद्रकांत पाटलांचे प्रयत्न

शहराची हद्दवाढ झाल्याशिवाय विकास होणार नाही. शहरालगत असणाऱ्या गावांना विश्वासात घेऊन याबाबतचा विचार केला पाहिजे. शहरात पायाभूत सुविधांचा विकास झाला, तरच पर्यटन, उद्योग, व्यापार वाढेल. हद्दवाढ हा शहराच्या विकासाच्या दृष्टीने कळीचा मुद्दा आहे. गेल्यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील आणि आमदार राजेश क्षीरसागर यांनी हद्दवाढीसाठी प्रामाणिक प्रयत्न केले. त्यासाठीचा शासन आदेशही निघाला; पण नंतर प्राधिकरण नेमण्यात आले

गावांचा विकास करणार

आबिटकर म्हणाले, प्राधिकरण नेमण्याचा उद्देश असा होता की 42 गावांचा विकास अशा पद्धतीने करायचा की त्यांना शहरात यावेसे वाटेल. मात्र, प्राधिकरणाची सुरुवातही झालेली नाही. आता नव्याने प्राधिकरण सक्षम करून गावांचा विकास करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

Ajit Pawar Prakash Abitkar
Pune : पुण्याचे नाव 'गुन्हे' करायला हरकत नाही; शरद पवार पक्षाच्या महिला नेत्या आक्रमक

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com