Kolhapur Politics : सतेज पाटलांनी सांगितला मुहूर्त, शेट्टींना सोबत घेण्यासाठी काय म्हणाले?

Satej Patil On Raju Shetti : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी काय निर्णय घेणार?
Raju Shetti, Satej Patil
Raju Shetti, Satej Patil Sarkarnama
Published on
Updated on

Satej Patil Kolhapur News :

स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडी सोबत राहणार की महायुती बरोबर जाणार? अशी चर्चा सध्या कोल्हापूर जिल्ह्यात जोर धरू लागली आहे. पण स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी यापूर्वीच आपण स्वतंत्र लढणार असल्याचे जाहीर केले आहे.

इचलकरंजी येथे झालेल्या मेळाव्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला. असे असताना काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी राजू शेट्टी यांना सोबत घेण्यासाठी केंद्रीय पातळीवर चर्चा सुरू केली आहे. त्यांनी आज त्या संदर्भात मुहूर्त सांगितला असून लवकरच याबाबत चित्र स्पष्ट होईल, असेही Satej Patil यांनी स्पष्ट केले.

Raju Shetti, Satej Patil
Mahayuti News : हातकणंगलेत महायुतीचे जुळता जुळेना; इचलकरंजीत आवाडे लागले तयारीला...

वरिष्ठ पातळीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना सोबत घ्यावे, असे आम्ही सांगितले आहे. लवकरच त्याबाबत चित्र स्पष्ट होईल, असे स्पष्टीकरण आमदार सतेज पाटील यांनी दिले आहे. काँग्रेसकडून आज समाजसुधारक हा चित्रपट पाहण्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

भाजपचा कॉन्फिडन्स गेलेला आहे. त्यामुळे त्यांची अशा पद्धतीची वक्तव्यं सुरू आहेत. बहुमत असतानाही पक्ष फोडण्याचे वेळ तुमच्यावर येते. जनमानसात असलेली तुमची प्रतिमा आणि नऊ वर्षांत केलेल्या कामांवर तुम्ही निवडणूक लढवली पाहिजे. इतरांना फोडून घेण्यामागचे कारण समजत नाही. मात्र सुशीलकुमार शिंदे यांनी त्यांवर स्पष्टीकरण दिले आहे. ते गेल्या पन्नास वर्षांपासून काँग्रेस बरोबर आहेत. म्हणून त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न होत आहे. याचा मी निषेध करतो, अशी प्रतिक्रिया दिली पाटील यांनी दिली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काँग्रेस एक संघ आहे, आणि यापुढेही एक संघ राहील. भाजप आगामी लोकसभा निवडणुकीत 400 पार होणार की 200 च्या पुढे जाणार नाही? हे देशातील जनता ठरवेल. भाजपने म्हटले म्हणजे 400 येणार म्हणजे येणार असं नाही. पण त्यासाठी लोकांनी मतदान करायला हवं. 2024 ची निवडणूक ही देशातील जनता विरुद्ध भाजपशी असेल, असा टोलाही आमदार सतेज पाटील यांनी लगावला.

edited by sachin fulpagare

Raju Shetti, Satej Patil
Kolhapur Politics : सतेज पाटलांची निवडणूक स्ट्रॅटेजी विरोधकांना करणार घायाळ; सोशल मीडिया ठरणार ब्रह्मास्त्र

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com