Raju Shetti Loksabha Election : स्वाभिमानी शेतकरी संघटनेला महाविकास आघाडीने पाठिंबा द्यावा, या भूमिकेवर राजू शेट्टी आजपर्यंत ठाम आहेत. यासंदर्भात शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची दोन वेळा शेट्टी यांनी भेट घेतली आहे. महाविकास आघाडीत दाखल न होता आघाडीने हातकणंगलेत स्वाभिमानीला पाठिंबा द्यावा, राज्यात महाविकास आघाडीला स्वाभिमानीकडून पाठिंबा मिळेल, अशी चर्चा यशस्वी झाल्याची माहिती आहे.
हातकणंगले लोकसभा मतदारसंघात (Loksabha Election) अखेर महाविकास आघाडीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांना पाठिंबा देण्याचा सकारात्मक निर्णय झाल्याची माहिती समोर येत आहे. याची अधिकृत घोषणा गुरुवारी 21 तारखेला होण्याची शक्यता आहे.
हातकणंगलेमध्ये ठाकरे गटाने उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरू केल्यानंतर राजू शेट्टी (Raju Shetti founder of Swabhimani Shetkari Saghtana) यांनी शनिवारी मुंबई येथे मातोश्रीवर जाऊन शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख ठाकरे यांची भेट घेतली. त्यासंदर्भात मंगळवारी दिल्लीत सकारात्मक चर्चा झाली आहे. Raju Shetti Lok sabha Election Updates Will Raju Shetty join Mahavikas Aghadi?
आगामी लोकसभा निवडणुकीत कोणत्याही युती आणि आघाडी सोबत न जाता माजी खासदार राजू शेट्टी यांनी ‘एकला चलो’चा नारा दिला होता. ते आजही आपल्या निर्णयावर ठाम आहेत. दुसरीकडे हातकणंगलेत तिरंगी लढत झाल्यास महायुतीचा पराभव अशक्य आहे, याची जाणीव महाविकास आघाडीच्या नेत्यांना आहे.
जर शेट्टी आघाडीत येत नसतील तर त्यांना पाठिंबा द्यावा या मानसिकतेत दिल्लीतील वरिष्ठ नेते आणि राज्यातील काही आघाडीतील प्रमुख नेत्यांचे मत आहे. Former MP Raju Shetty had raised the slogan of 'Ekla Chalo' without joining any alliance in the upcoming Lok Sabha elections.
या पार्श्वभूमीवर गेली दोन दिवस महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shivsena UBT ) पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार व काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांमध्ये काही निवडक जागांवर खलबते सुरू आहेत. त्यात हातकणंगलेचाही ( hatkanangale) समावेश आहे.
ही जागा आम्हाला मिळावी आणि राजू शेट्टींनी लढावे, अशी शिवसेना ठाकरे गटाची भूमिका आहे. मात्र, त्याला शेट्टी तयार नाहीत. दुसरीकडे काँग्रेसने शेट्टी यांना पाठिंबा द्यावा, अशी भूमिका घेतली आहे. हीच भूमिका राष्ट्रवादी (NCP)पवार गटाची आहे.
सद्यःस्थितीत महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांत तुल्यबळ असा उमेदवार नाही. त्यामुळे आघाडीसमोर शेट्टी यांना पाठिंबा देण्याशिवाय पर्याय नाही, अशी स्थिती आहे. काँग्रेससोबत शनिवारी मुंबईमध्ये चर्चा झाली होती. त्यानंतर आज थेट दिल्लीत काँग्रेसच्या हायकमांडसोबत राज्यातील काही नेत्यांनी चर्चा केली. त्यात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आमदार बाळासाहेब थोरात ( Balasaheb Thorat) आणि सतेज पाटील ( Satej Patil) आदींचा समावेश आहे. या बैठकीत महाविकास आघाडीने शेट्टी (Raju Shetty) यांना पाठिंबा दिला आहे.
Edited By : Rashmi Mane
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.