
Kolhapur News : राज्य सरकारने कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील कृष्णा-भीमा खोऱ्यातील पूर आपत्ती नियंत्रणासाठी जागतिक बँकेच्या सहाय्याने निधी मिळवला आहे. पण या निधीवर डल्ला मारण्याचा डाव असल्याचा आता सशंय येत असल्याची आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे. या आरोपांमुळे आता कोल्हापुसरसह सांगली जिल्ह्यात एकच खळबळ उडालेली आहे.
महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रम (MRDP) अंतर्गत कोल्हापूर, सांगली मिरज-कुपवाड आणि इचलकरंजी शहरांत हवामान बदलावर आधारित पूर, उष्णतेची लाट, वादळ या सारख्या आपत्तींपासून होणारे परिणाम कमी करण्यासाठी उपाययोजना आखण्यात येणार आहेत. या कामाच्या कोल्हापूर व सांगली मिरज कुपवाड तसेच इचलकरंजी महापालिकेच्या पहिल्या टप्यातील 900 कोटी रूपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे.
पण आता याच कामावरून माजी खासदार राजू शेट्टी यांनी जोरदार अक्षेप घेताना टीका केली आहे. त्यांनी, या कामात राज्य सरकारकडून पूर नियंत्रणापेक्षा घाईगडबडीत निधी खर्च करून ठेकेदार व लोकप्रतिनिधीना पोसण्याचेच उद्योग सुरू असल्याची टीका केली आहे.
सांगली व कोल्हापूर जिल्हयामध्ये होणाऱ्या संभाव्य आपत्तीच्या परिणामांची माहिती होण्यासाठी उच्च प्रतीचे नकाशे तयार करणे, त्याआधारे उपाय योजना करणे, शहरात उद्याने, तलाव तयार करणे, तसेच अतिवृष्टीमुळे येणाऱ्या पाण्याचा निचरा करणे, नदी-नाल्यांची रुंदीकरण खोलीकरण करणे, पूर नियंत्रणासाठी संरक्षक भिंती बांधणे, यासारख्या कामांचा अजून सर्व्हे सुरू आहे. पण राज्य सरकारने घाईबडीने महापालिका हद्दीतील गटारी कामांना प्रशासकीय मान्यता देवून 30 टक्के हिस्याचा निधी खर्च करण्याचा घाट घातला आहे. पूर नियंत्रणासाठी जलसंपदा विभागासह इतर विभागांच्या तज्ज्ञांकडून तसेच नेमण्यात आलेल्या एजन्सीकडून सर्व्हे करण्याचे काम सुरू असून याबाबतचा सविस्तर अहवाल अजून प्राप्त झालेला नाही.
पूर नियंत्रण कसे होणार? याबाबतच्या काय उपाययोजना काय असणार? महापुरातील पाण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी अडथळे ठरत आहेत? नद्यांची खोलीकरण व रुंदीकरण किती करावे लागणार? यामध्ये कोणत्या कोणत्या नद्यांचा समावेश असणार? शहरातील महापुरातील पाणी नियंत्रणात ठेवण्यासाठी पाणी पातळी किती मीटर वरती स्थिरावणार? यापैकी कोणताच अहवाल अजून पुर्ण झालेला नाही. यामुळे गडबडीत महापालिका क्षेत्रातील गटाराची कामे पुर्ण करून जागतिक बँकेच्या निधीवर डल्ला मारण्याचा डाव असल्याचा संशय येवू लागला आहे, असा दावाही राजू शेट्टी यांनी केला आहे.
मुळात महापालिका क्षेत्रातील गटारीच्या कामांना नगरविकास विभागाकडून निधी मिळू शकतो. मात्र पूर नियंत्रणासाठी एवढ्या मोठ्या निधीची तरतूद राज्य सरकारकडे नसल्याने पहिल्यांदा पुर नियंत्रण व नदी पात्रातून शहरात येणाऱ्या पाण्याचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. जर महापुरात महापालिका क्षेत्रातून बाहेर जाणाऱ्या पाण्यापेक्षा नदीपात्रातून शहरात येणाऱ्या पाण्याचा प्रवाह जादा असेल तर आता गडबडीत करण्यात येणाऱ्या कामाचा कोणताच लाभ नागरीकांना होणार नाही.
यामुळे राज्य सरकारने जागतिक बँकेकडून मिळणाऱ्या निधीचे योग्य नियोजन करून तज्ज्ञांसोबत सदर परिपुर्ण प्रकल्प प्रस्तावाचे पहिल्यांदा सादरीकरण करून मगच निधी खर्चात करण्यात यावा. अन्यथा दोन वर्षांनी 3400 कोटी रूपयाचा निधी खर्ची टाकूनही पूर नियंत्रणावरती कोणतीच उपाययोजना झाले नसल्याचे निदर्शनास येणार असल्याचे शेट्टी म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.