
Raju Shetty News: राज्य शासनाने एक रुपयात पिक विमा ही योजना रद्द केली आहे. या योजनेत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याने त्याची चौकशी करण्यात येईल असे जाहीर केले आहे. मात्र यातून एक नवा वाद उभा राहण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक रुपयात पिक विमा योजना रद्द करण्याची घोषणा केली आहे. या योजनेत राज्यात हजारो बोगस अर्ज आल्याचे त्यांनी सांगितले. संदर्भात ‘एसआयटी’ मार्फत चौकशी करण्यात येणार असल्याचेही जाहीर करण्यात आले आहे. या निर्णयाने शेतकरी नाराज आहेत
यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सरकारचे वाभाडे काढले आहे. शेतकऱ्यांनी कधीही या योजनेची मागणी केली नव्हती. सरकारने स्वतःच ही योजना जाहीर केली होती. त्याचा गाजावाजा देखील सरकारच करीत होते.
शेतकऱ्यांना जे नुकसान होईल त्याची भरपाई मिळेल अशी सोपी विमा योजना हवी आहे. यासाठी सरकारने नियमित विमा योजना आणावी. शेतकरी त्याचा हप्ता भरण्यास तयार असेल. मात्र विमा कंपन्यांनी गैरकारभार करून शेतकऱ्यांना फसवू नये हीच अपेक्षा आहे.
एक रुपयात पिक विमा या योजनेत जर गैर कारभार झाला असेल, तर तो सरकार पुरस्कृत होता. हे लपून राहिलेले नाही. कृषी अधिकारी आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी हात धुवून घेतले आहेत. प्रशासनातील ही यंत्रणा आणि वरिष्ठांचे आशीर्वाद असल्याशिवाय हे घडू शकत नाही.
राज्य सरकारने पीक विमा कंपन्यांना पोसण्यासाठी ही योजना आणली होती, असा गंभीर आरोप माझी खासदार शेट्टी यांनी केला. यामध्ये गैरव्यवहार झाल्याचे राज्य सरकारने म्हटले आहे. आता त्यातील दोषींवर कारवाई करण्याची जबाबदारी सरकारवर आहे. ती जबाबदारी सरकारने टाळू नये.
शेतकऱ्यांचे नुकसान लातूर आणि परभणीला झाले. मात्र या योजनेत त्यांची भरपाई परळीच्या लोकांच्या खात्यात कशी जमा होते?. त्यात सरकारची यंत्रणा सहभागी असल्याशिवाय एवढा मोठा घोटाळा होऊ शकत नाही. हा घोटाळा ज्यांनी केला त्यांच्यावर कारवाई करण्याची गरज आहे. सोडून सरकारने शेतकऱ्यांना नाडण्याचे काम सुरू केले आहे.
अद्यापही सरकारने पुरेसा विचार करून विमा योजना जाहीर करावी. शेतकऱ्यांचे जे नुकसान होईल ते त्याला मिळाले पाहिजे. त्यात विमा कंपन्यांनी टाळाटाळ किंवा फसवणूक करता कामा नये. विमा कंपन्यांनी तसे केल्यास शासनाने त्यांना कडक शासन करण्याची व्यवस्था करावी, असे माजी खासदार शेट्टी म्हणाले.
-------
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.