Raju Shetti News : एकरकमी FRP साठी राजू शेट्टी कोर्टाची पायरी चढणार; सरकार अन् साखर संघाचे संगनमत असल्याचा आरोप...

FRP issue in Mumbai High Court : राज्य सरकार आणि राज्य साखर संघाकडून सदर प्रकरण न्यायालयात न्याय प्रविष्ट करून एक रक्कमी एफ. आर. पी न देण्याचा प्रयत्न जोरदारपणे सुरू असल्याचा आरोप राजू शेट्टींनी केला आहे.
Raju Shetti On Ajit Pawar News
Raju Shetti On Ajit Pawar NewsSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur Politics : राज्य सरकार व राज्य साखर संघाने संगनमताने नुरा कुस्ती खेळत आहे. राज्यातील उस उत्पादक शेतक-यांना पुन्हा एकदा तुकड्या तुकड्याने एफ. आर. पी. मिळावी याकरिता मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत दिली.

राज्यातील ऊस उत्पादक शेतक-यांच्या वतीने जवळपास तीन वर्षे न्यायालयीन लढाई करून एक रक्कमी एफ. आर. पी. देण्याचा निर्णय पुर्ववत करण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाकडून देण्यात आला होता. या प्रकरणामध्ये राज्यातील राज्य साखर संघ, राज्य सरकार, केंद्र सरकार हे सर्वजण शेतक-यांच्याविरोधात भुमिका मांडली होती, असे शेट्टींनी सांगितले.

एफ. आर. पी. कशापध्दतीने एकरकमी देणे कायदेशीररित्या बंधनकारक आहे, याबाबत 50 तास सुनावणी सुरू होती. या सुनावणी दरम्यान राज्य सरकार, राज्य साखर संघ व केंद्र सरकारने आपली भुमिका मांडली होती तरीही उच्च न्यायालयाने सर्व गोष्टीची कायदेशीर बाजू ऐकून घेऊनच हा निर्णय दिलेला होता, असेही शेट्टींनी स्पष्ट केले.

Raju Shetti On Ajit Pawar News
Supreme Court News : बॉसशी नव्हे, संविधानाशी एकनिष्ठ राहा! सुप्रीम कोर्टाने पोलिस अधिक्षकांना झापले, धक्कादायक प्रतिज्ञापत्राने जजही अवाक...

राज्यात ऊस उत्पादक शेतक-यांना वेळेवर बिले मिळत नसल्याने आत्महत्या करू लागले आहेत. याआधी राज्य साखर संघाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन या निर्णयास स्थगिती घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना अपयश आल्याने राज्य सरकार व राज्य साखर संघ रडीचा डाव खेळत आहे, असा आरोप शेट्टींनी केला आहे. हा डाव यशस्वी होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी सरकारला दिला.

Raju Shetti On Ajit Pawar News
Vice President Election update : मोदी-शहांनी राजकीय शत्रूचं मन वळवलं, पण काँग्रेसच्या 'मास्टरस्ट्रोक'नं सगळं फिस्कटणार? 'NDA'ची डोकेदुखी वाढली...

दोघांच्या संगनमताने सदर प्रकरण न्यायालयात न्याय प्रविष्ट करून एक रक्कमी एफ. आर. पी न देण्याचा प्रयत्न जोरदारपणे सुरू आहे. सोमवारी या याचिकेमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने ॲड. योगेश पांडे हे हस्तक्षेप याचिका दाखल करणार असल्याची माहिती राजू शेट्टी यांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com