Raju Shettis Announcement : राजू शेट्टींची मोठी घोषणा; ‘स्वाभिमानी’त यापुढे राजकीय नेते-कार्यकर्त्यांना प्रवेश नाही

Pandharpur News : माजी खासदार राजू शेट्टी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भूमिकेचेही समर्थन केले.
Raju Shetti
Raju Shettisarkarnama

Pandharpur News : माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज (ता. ३ ऑक्टोबर) स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेत यापुढे कोणत्याही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याला किंवा नेत्यांना प्रवेश दिला जाणार नाही. पक्षातील कार्यकर्त्यांना संधी देऊन पक्षसंघटना मजबूत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राजू शेट्टी यांनी याबाबतची घोषणा पंढरपुरात केली आहे. शेट्टी यांच्या घोषणेची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. (Raju Shetti's big announcement; Political leaders-activists no entry in to 'Swabhimani')

राज्यातील साखर कारखानदारांनाही राजू शेट्टी यांनी इशारा दिला आहे. ‘मागील हंगामात गाळप झालेल्या उसाचे थकीत ४०० रुपये दिल्याशिवाय एकाही साखर कारखान्याचे धुराडे पेटू देणार नाही,’ असेही शेट्टी यांनी म्हटले आहे. तसेच, साखर निर्यातीवरील बंदीही केंद्र सरकारने त्वरित मागे घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.

Raju Shetti
NCP Minister Upset : राष्ट्रवादीचे मंत्री अस्वस्थ?; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट

सोलापूर जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पंढरपूर येथे राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत आज झाली. त्या बैठकीत पक्षसंघटनेबाबत वरील निर्णय घेण्यात आलेला आहे. त्याबाबतची घोषणा शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत केली. तसेच, त्यांनी अनेक मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली.

राज्यातील साखर कारखान्यांना सरकारने ठरवून दिलेल्या साखर विक्रीच्या किमतीपेक्षा प्रतिक्विंटल ५०० रुपये अधिकचे मिळाले आहेत. इथेनॉलचा खरेदीदरही वाढला आहे. त्यामुळे साखर कारखान्यांनी ऊस उत्पादकांना प्रतिटन ४०० रुपये देणे अपेक्षित आहे. ती थकीत रक्कम लवकर द्यावी; अन्यथा साखर कारखान्याच्या विरोधात आंदोलन केले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

Raju Shetti
MLA Disqualification Case : एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरेंना विधिमंडळ आज नोटिसा पाठविणार...

माजी खासदार राजू शेट्टी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भूमिकेचेही समर्थन केले. राज्य सरकारने साखर कारखान्यांना थकहमी देऊ नये. तसेच भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ साखर कारखान्याकडे जीएसटीचा कर थकला असेल, तर तो त्यांनी भरणे अपेक्षित आहे. जीएसटीची कारवाई ही त्या विभागाचे काम आहे, असं सांगत वैद्यनाथ कारखान्यावरील कारवाईचे शेट्टी यांनी समर्थन केले आहे.

Raju Shetti
Manoj Jarange Solapur Tour : मनोज जरांगे 5 ऑक्टोबरपासून सोलापूर दौऱ्यावर; या पाच ठिकाणी होणार जाहीर सभा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com