Swabhimani Shetkari Sanghatna News : महाविकास आघाडीने राजू शेट्टींच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला गृहित धरून लोकसभेची एक जागा ऑफर केली होती. ही ऑफर राजू शेट्टींनी धुडकावलीय आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना लोकसभेच्या सहा जागा स्वबळावर लढणार आहे. पश्चिम महाराष्ट्रात बहुतांश कारखाने हे महाविकास आघाडीतील नेत्यांचेच असून, त्यांनी ऊसदराकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे शेट्टी यांनी यापुढे महाविकास आघाडीशी काडीमोड घेत स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे Swabhimani Shetkari Sanghatna नेते राजू शेट्टी Raju Shetty हे ऊसदराच्या प्रश्नावरून आक्रमक झाले आहेत. ऊसदराबाबत संघटनेने कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यात आक्रमक पद्धतीने आंदोलने करूनही कारखानदारांनी याकडे दुर्लक्ष करून ऊसदराचा प्रश्न लोंबकळत ठेवला आहे.
पश्चिम महाराष्ट्रात बहुतांश कारखाने हे महाविकास आघाडीतील Mahavikas Aghadi नेत्यांचेच असून, त्यांनी ऊसदराकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे शेट्टी यांनी नाराज होत महाविकास आघाडीशी काडीमोड घेत स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे, असे संघटनेचे प्रवक्त अनिल पवार यांनी सांगितले.
स्वाभिमानी शेतकरी संघटना आता एकला चलोच्या भूमिकेत आहेत. तसेच शेट्टी हे महाविकास आघाडी व महायुतीवरही नाराज आहेत. त्यामुळे त्यांनी स्वबळाचा निर्णय घेतला आहे, याबाबत प्रवक्ते अनिल पवार म्हणाले, स्वाभिमानी संघटना निवडणूक रणांगणाचा विचार करत नाही. आज उसदराचा दर महत्वाचा असून, मागील चारशे रुपये मिळणे महत्त्वाचे आहे.
राजू शेट्टी पाचशे किलोमीटर चालत आले तरी कारखानदारांना उसाचा दर जाहीर करावा व शेतकऱ्यांची दिवाळी चांगली करावी असे वाटत नाही. महाविकास आघाडच्या ऑफरकडे आमचे लक्ष नाही. दोन्ही आघाड्यातील नेत्यांचे ऊसदराकडे लक्ष नाही. पश्चिम महाराष्ट्रात बहुतांश कारखाने हे महाविकास आघाडीतील नेत्यांचेच असून त्यांनी ऊस दराकडे दूर्लक्ष केले आहे. Maharashtra Political News
या मतदारसंघात लढणार....
त्यामुळे आम्ही स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला आहे. आमची ताकत कमी असली तरी लोकसभेच्या सहा जागा लढणार असून, हातकणंगल्यातून राजू शेट्टी लढतील, रविकांत तुपकर बुलढाण्यातून लढतील, तसेच माढा, सांगली, कोल्हापूर व परभणीत आमची ताकत आहे. त्यामुळे या निवडणुका आम्ही लढून या आघाडीतील नेत्यांना आमची ताकत दाखवून देऊ, असे पवार यांनी सांगितले.
Edited By : Umesh Bambare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.