Mahavikas Aghadi News : पुण्यात शिवसेना करणार काँग्रेसची कोंडी; लोकसभेच्या तीन जागांवर दावा

Shivsena On Loksabha : बारामती लोकसभा मतदारसंघावर आम्ही दावाही करणार नाही; पण....
Mla Sachin Ahir
Mla Sachin Ahir Sarkarnama
Published on
Updated on

Daund News : महाविकास आघाडीतील शिवसेनेने पुण्यातील आणखी एका जागेची अपेक्षा व्यक्त केली आहे. आम्ही बारामती लोकसभा मतदारसंघ मागणार नाही. पण शिरूर, मावळ आणि पुण्यात आम्हाला अनुकूल वातावरण आहे, त्यामुळे पुणे जिल्ह्यात शिवसेनेला आणखी एक लोकसभा मतदारसंघ मिळावा, अशी आमची अपेक्षा आहे, असे शिवसेनेचे (ठाकरे गट) प्रवक्ते तथा आमदार सचिन अहिर यांनी सांगितले. (Shiv Sena will challenge Congress in Pune; Claiming three Lok Sabha seats)

दरम्यान, पूर्वीची युती आणि आघाडीमध्ये शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघ हे शिवसेनेकडे हेाते, तर पुणे आणि बारामती हे दोन मतदारसंघ भाजपकडे होते. आघाडीमध्ये मावळ, शिरूर आणि बारामती लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे होते, तर पुण्यातून काँग्रेस लढत होती. आता शिवसेनेने आम्ही बारामती मागणार नाही म्हणत अप्रत्यक्षपणे पुण्यावर दावा केला आहे, त्यामुळे काँग्रेस आणि शिवसेना पुण्याच्या जागेवरून आमने-सामने येण्याची शक्यता आहे.

Mla Sachin Ahir
Dharashiv Loksabha Election : पंकजा मुंडे धाराशिवमधून लोकसभेचे धनुष्य उचलणार? राणा जगजितसिंहांना धक्का बसणार?

आमदार सचिन अहिर पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. दौंडमध्ये पत्रकारांशी बोलताना जिल्ह्यातील तीन मतदारसंघावर दावा केला आहे. त्यामुळे आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकीकडे पुण्यावर दावा करताना लोकसभा जागावाटपाच्या प्रश्नावर पक्षाला मर्यादांचीही जाणीव आहे, असेही अहिर यांनी म्हटले आहे.

सत्तेच्या जोरावर अनेक पक्ष फोडून एकाधिकारशाहीकडे झुकलेल्या सत्ताधाऱ्यांना आगामी लोकसभा निवडणुकीत रोखण्याचा आमचा निश्चय आहे. त्यासाठी शिवसेना दोन पावले मागे घेण्याच्या भूमिकेत असेल. बारामती लोकसभा मतदारसंघावर आम्ही दावाही करणार नाही, असेही अहिर यांनी स्पष्ट केले.

Mla Sachin Ahir
Bhor MLA Issue : 'अजितदादा, तुमचा आमदार होऊ न देण्याचा डायलॉग ‘भोर’मध्ये खरा करून दाखवा'; राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची प्रेमळ मागणी

शिवसेनेची भाजपशी युती असताना पक्ष संघटनेकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यांत संघटनेच्या बांधणीकडे लक्ष देण्यात येत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत जिंकून येणारा उमेदवार हाच निषक उमेदवारीसाठी लावण्यात येणार आहे. त्यासोबतच स्थानिक परिस्थिती पाहूनच अंतिम निर्णय घेतला जाईल. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या माध्यमातून शिवसेनेचे संख्याबळ वाढविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.

Mla Sachin Ahir
Ajit Pawar Satara Tour : अजित पवारांचे सातारच्या सीमेवर जंगी स्वागत; गर्दी पाहून धनंजय मुंडे गाडीतच बसले

तामिळनाडूतील द्रमुकचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा आम्ही निषेध करतो, असेही अहिर यांनी स्पष्ट केले. या वेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शरद सूर्यवंशी, उपजिल्हप्रमुख अनिल सोनवणे, राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) तालुकाध्यक्ष अप्पासाहेब पवार, आदी या वेळी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com