Raju Shetty Vs Sadabhau khot : याला म्हणतात पलटवार; राजू शेट्टी सदाभाऊंना म्हणाले; 'कडकनाथसारखे घोटाळे करून संसदेत...”

Mahayuti Political News : शिराळामधील धैर्यशील माने यांच्या आभार कार्यक्रमात बोलताना माजी खासदार राजू शेट्टी यांच्यावर सदाभाऊ खोत यांनी टीका केली होती.
Raju Shetti, Sadabhau Khot
Raju Shetti, Sadabhau Khot Sarkarnama
Published on
Updated on

Lok Sabha Election Result : लोकसभा निवडणुकीचा धुरळा बसला असला तरी सत्ताधारी व विरोधकांकडून एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडली जात नाही. एकमेकांवर करण्यात येणाऱ्या आरोप-प्रत्यारोपामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे.

हातकणंगले मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचा पराभव झाला. त्यानंतर ‘स्वाभिमानी’चे नेते राजू शेट्टी आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्यामध्ये कलगीतुरा चांगलाच रंगला आहे. शिराळामधील धैर्यशील माने (Dhairysheel Mane) यांच्या आभार कार्यक्रमात बोलताना माजी खासदार राजू शेट्टी यांच्यावर सदाभाऊ खोत यांनी टीका केली होती. (Raju Shetty Vs Sadabhau khot News)

शेट्टी हे शेतकऱ्यांसाठी लढत नव्हते तर खासदारकीसाठी लढत होते. कारण त्यांनी जयंत पाटील आणि बंटी पाटील यांना कागदावर लिहून दिले होते. मी तुमचाच गुलाम राहणार आहे. शेतकऱ्यानं सांगत होता की मी तुमच्यासाठी लढतोय, अशी टीका खोत यांनी केली होती.

दरम्यान, सदाभाऊ खोत यांनी केलेल्या टिकेला राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी त्याच शब्दात जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. “मी कडकनाथसारखे घोटाळे करून संसदेत जात नाही”, असा टोला शेट्टी यांनी लगावला. खासदार होणे हा काय गुन्हा नाही किंवा वाईट नाही. सर्वसामान्य जनतेचे प्रश्न संसदेत मांडण्यासाठी आणि सोडवण्यासाठी खासदार व्हायचे असते, असा टोला शेट्टी यांनी लगावला.

Raju Shetti, Sadabhau Khot
Shivsena 58th Anniversary : 19 जून 1966...; मराठी माणसाची करारी शिवसेना आता झाली 58 वर्षांची!

या पूर्वी मी लोकसभा निवडणुकीत मी चारवेळा लढलो पण दोन वेळा यश मिळाले. आता पुन्हा लढत राहणार आहे. कारण मला संसदेत जनसामान्यांचे प्रश्न मांडायचे आहेत. संसदेत जाण्याची महत्त्वकांक्षा बाळगली तर त्यात गैर काय?”, मी कडकनाथसारखे घोटाळे करून जात नाही. कोणाचे पाय धरून जात नाही, असेही शेट्टी म्हणाले.

शेट्टी यांनी दिले सदाभाऊ खोत यांना आव्हान

मी स्वत:च्या हिमतीवर आणि सर्वसामान्य माणसांचा विश्वास संपादन करून आणि शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करून संसदेत जाण्याचा प्रयत्न करत आहे. आता ज्यांना वाईट वाटते त्यांनीही संसदेत जाण्याचा प्रयत्न करावा. लोक ठरवतील कोणाला संसदेत पाठवायचे, असं आव्हान राजू शेट्टी यांनी सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांना दिले.

Raju Shetti, Sadabhau Khot
Shivsena Foundation Day 2024 : शिवसेना पक्षसंघटनेत शाखाप्रमुखच ताकदवान; नगरसेवक ते मंत्रिपदापर्यंत वाटचाल

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com