Rajavardhan Kadambande News : 'मी छत्रपती शाहू महाराजांचा रक्तामासाचा वारसदार, आत्ताचे शाहू हे..' ; राजवर्धन कदमबांडेंचं विधान!

Kolhapur Lok Sabha Constituency : कोल्हापुरच्या जनतेला इतिहास माहिती आहे. 1962 ला दत्तक प्रकरण गाजले आहे, असंही म्हणाले आहेत.
Rajavardhan Kadambande
Rajavardhan KadambandeSarkarnama

Loksabha Election 2024 : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे पणतू धुळे व नंदुरबार जिल्हा बँकेचे अध्यक्ष तथा माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांनी कोल्हापूरात स्पेशल विमानाने दाखल होत, पत्रकारपरिषद घेतली. यावेळी त्यांनी मी शाहू महाराजांचा रक्तामासांचा वारसदार असल्याचं म्हटले. तसेच महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांना विजयी करा असे आवाहन केले.

राजवर्धन कदमबांडे(Rajavardhan Kadambande) म्हणाले, 'मी छत्रपती शाहू महाराजांचा रक्तामासाचा वारसदार आहे, जनता ठरवेल की गादीचे खरे वारसदार कोण आहेत? असं विधान शाहू महाराजांचे पणतू राजवर्धन कदमबांडे यांनी केलं आहे. कोल्हापूरात पत्रकारपरिषदेत ते बोलत होते. शाहू महाराजांचा राजकीय बळी झाला का हे त्यांनी ठरवावं.'

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Rajavardhan Kadambande
Aditya Thackeray News : 'भाजप जिंकणार नाही, मात्र चुकून जिंकली तर ...' आदित्य ठाकरेंचं कोल्हापूरात मोठं विधान!

याचबरोबर 'एकीकडे कोल्हापूरचे शाहू महाराज हे काँग्रेसच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक लढवत आहेत, तर दुसरीकडे शाहू महाराजांचे पणतू राजवर्धन कदमबांडे यांनीच कोल्हापूरमधील महायुतीच्या उमेदवारास विजयी करा असं आवाहन केलं आहे. आताचे शाहू महाराज हे केवळ संपत्तीचे वारसदार आहेत, अशी टीका त्यांनी केली आहे.' असंही म्हणाले.

याशिवाय 'मी केवळ छत्रपती शाहू महाराजांचा वारसदार म्हणून या कोल्हापूर शहरातील जनतेला आणि जिल्ह्यातील जनतेला आमच्या भाजपा(BJP) महायुतीच्या दोन्ही उमेदवारांना विजयी करा, असं आवाहन करण्यासाठी मी इथे आलेलो आहे. कोल्हापुराच्या जनतेला इतिहास माहिती आहे. 1962 ला दत्तक प्रकरण गाजले आहे. गादीचे वारसदार ते स्वत:हून म्हणत आहेत. जनता ठरवेल की गादीचे खरे वारसदार कोण? पण आमच्या कौटुंबिक वादात मी जाणार नाही, तो आमचा आम्ही बघून घेऊ.' असं कदमबांडे यांनी सांगिलं.

Rajavardhan Kadambande
Fadnavis On Mohite Patil : पवारांसोबत जाण्याचा निर्णय मोहिते पाटील कुटुंबीयांतील सर्वांना पटलेला नाही; फडणवीसांनी संधी साधली

तसेच 'मी काही संपत्तीचा वारसदार नाही. मी शाहू महाराजांच्या विचारांचा वारसदार आहे. कोल्हापूर आणि हातकणंगले या मतदार संघात मी भाजपचा प्रचार करणार, शाहू महाराजांच्या विचारांच्या विरोधात भाजप आहे हे कोणी सांगितले?' असा सवालही त्यांनी केला.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com