Solapur Loksabha Constituency : सोलापूरसाठी भाजपकडून राम सातपुतेंची उमेदवारी निश्चित; दोन आमदारांमध्ये होणार लढत

Ram Satpute News : सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडून अगदी सहा महिन्यांपासून आमदार राम सातपुते यांचे नाव चर्चेत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असलेल्या सातपुते यांना पक्षाने कामाला लागण्याची सूचना दिल्याचे सांगण्यात येत आहे.
Ram Satpute
Ram Satpute Sarkarnama
Published on
Updated on

Solapur, 17 March : सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी भारतीय जनता पक्षाकडून माळशिरसचे आमदार आमदार राम सातपुते यांचे नाव निश्चित झाले आहे. त्यांची लढत काँग्रेसच्या संभाव्य उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांच्याशी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोलापूर लोकसभेची लढाई ही दोनही युवा आमदारांमध्ये होणार हे जवळपास पक्के झाले आहे.

सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडून अगदी सहा महिन्यांपासून आमदार राम सातपुते यांचे नाव चर्चेत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असलेल्या सातपुते यांना पक्षाने कामाला लागण्याची सूचना दिल्याचे सांगण्यात येत आहे. राम सातपुते हे सोलापूरसाठी परफेक्ट उमेदवार समजण्यात येत होते. मात्र, पहिल्या दिवसांपासून सातपुते यांचा लोकसभेला ‘ना ना’ चा पाढा होता. उपमुख्यमंत्री फडणवीस यांना तसे कळविलेही होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ram Satpute
Mohite Patil's Dinner Diplomacy : माढ्यासाठी मोहिते पाटलांची ‘शिवरत्न’वर डिनर डिप्लोमसी

आमदार राम सातपुते यांनी माळशिरस विधानसभा मतदारसंघात बऱ्यापैकी जम बसविला आहे, त्यामुळे त्यांना माळशिरस सोडण्याची इच्छा नव्हती, त्यामुळे त्यांनी लोकसभेसला नकार कळविला होता. मात्र, सोलापुरातून काँग्रेसच्या संभाव्य उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांना तोडीस तोड उमेदवाराचा शोध सातपुते यांच्यापाशी येऊन थांबत असल्याने पक्षाने त्यांना सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचे आदेश दिल्याचे सांगण्यात येते.

दरम्यान, सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी आमदार विजयकुमार देशमुख यांनी एका माजी नगरसेवकाचे, तर माजी मंत्री, आमदार सुभाष देशमुख यांनी एका माजी नगरसेविकचे नाव सुचविले होते. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी सोलापुरात येऊन उमेदवारासंदर्भात चाचपणीही केली हेाती. त्यावेळी स्थानिक उमेदवार देण्याची मागणी भाजप पदाधिकाऱ्यांनी केली होती. याशिवाय माजी खासदार अमर साबळे, शरद बनसोडे यांचेही नावे चर्चेत होती. मात्र, भाजप हायकमांडने राम सातपुते यांना सोलापूर लोकसभेच्या मोहिमेवर पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.

Ram Satpute
Girish Mahajan On Akluj Tour : फडणवीसांचा निरोप घेऊन संकटमोचक महाजन मोहिते पाटलांच्या भेटीला

दरम्यान, राम सातपुते हे विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यातील माळशिरसमधून निवडून आले होते. विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते ते युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून त्यांच्यावर पक्षाने संघटनात्मक जबाबदारी सोपवलेली आहे. भाजपच्या दुसऱ्या यादीमध्ये राम सातपुते यांचे नाव येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Ram Satpute
Mohite Patil Akluj Meeting : ‘शिवरत्न’वरील चर्चेनंतर जयंत पाटलांचे मोठे भाकित; येत्या 10 दिवसांत महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल घडतील...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com